‘ज्या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण होत आहे, त्या खासगी कंपन्याच होत्या!’

‘ज्या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण होत आहे, त्या खासगी कंपन्याच होत्या!’

सार्वजनिक क्षेत्रातील ज्या उपक्रमांचे (पीएसयू) खासगीकरण केले जात आहे, ते प्रत्यक्षात खाजगी क्षेत्रानेच तयार केलेले आहेत, असे स्पष्टीकरण मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनी केले आहे. खासगीकरणाच्या धोरणावरून होत असलेल्या टीकेला सन्याल यांनी हे उत्तर दिले आहे.

हे सरकार खाजगीकरणाबद्दल एकदम स्पष्ट भूमिका घेत आहे. यावर जोर देताना ते म्हणाले की “तुम्ही (विरोधी पक्ष) हा जो मुद्दा उपस्थित करताय की सगळ्या पीएसयू रक्त आणि घाम गाळून उभ्या केल्या आहेत. म्हणून, मी सरळ यावर बोलू इच्छितो, खरं तर ज्यांचे आम्ही खासगीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्या कंपन्या प्रत्यक्षात खाजगी क्षेत्रानेच उभारलेल्या आहेत.” उदाहरण देत ते म्हणाले की, एअर इंडियाचे मुळात १९५३ साली राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ती खासगी कंपनीच होती.

“१९६९ साली, बँका खाजगी क्षेत्राकडून लगेच काढून घेण्यात आल्या आणि राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्यामुळे, जेव्हा लोक म्हणतात की या संस्था भारतीय नोकरशाहीच्या रक्त आणि घामाने बांधल्या गेल्या आहेत, तेव्हा मी तुम्हाला सांगतो की या गोष्टी मुळात खासगी कंपन्यांनी बनवल्या होत्या.” इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सान्याल म्हणाले.

ते म्हणाले की, “अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खासगीकरणाच्या उद्देशाने आधीच धोरणात्मक आणि बिगर-धोरणात्मक क्षेत्रांची रूपरेषा तयार केली आहे. त्यामुळे आता धोरणात्मक क्षेत्रात सरकारची किमान उपस्थिती असेल. जेथे आवश्यक असेल तेथे सार्वजनिक क्षेत्रातील नवीन संस्था निर्माण करण्यास सरकार मागे हटणार नाही असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

कोळसा संकटावर काय म्हणाले केंद्रीय ऊर्जा मंत्री?

काय आहे पीएम गती शक्ती योजना?

आरे वसाहतीत आता बिबट्यांपायी दुचाकीवरून फिरणेही मुश्कील

नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज

डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन (डीएफआय) च्या स्थापनेचे उदाहरण देत ते म्हणाले की, सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (एनएबीएफआयडी) साठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या निधीसाठी अलीकडेच नॅशनल बँक तयार केली.

Exit mobile version