मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पावती

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पावती

कोरोनोत्तर काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग २०२१ मध्ये १२.५ टक्के राहील असं भाकित आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केले आहे. हा वेग ऐन कोरोना काळातही वृद्धीदर नोंदवणाऱ्या चीन या एकमेव अर्थव्यवस्थेच्या वेगापेक्षा अधिक राहणार आहे.

जागतिक बँकेची वसंत ऋतूतील बैठक लवकरच वॉशिंग्टन येथे होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक धुरीणांकडून हा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर २०२२ या वर्षात ६.९ टक्के राहिल असा नवा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोना महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार विक्रमी ८ टक्क्यांनी आकुंचित झाला होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेतील वृद्धी १२.५ टक्के अपेक्षित धरली आहे.

हे ही वाचा:

लॉकडाऊनवरून ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले

ठाकरे सरकारने जे काही झोल झपाटे केलेत ते सांगून टाका

ठाकरे सरकारने व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणले

कोरोना महामारीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था चांगलीच आकुंचित पावली होती. मात्र आता भारतीय अर्थव्यवस्था सावरायला लागली आहे. मार्चमध्ये भारतात जीएसटीमधून विक्रमी उत्पन्न गोळा झाले होते.

याबाबत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी या बाबत ट्वीट केले आहे. “कोरोनाच्या संकट काळात देखील भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर सर्वोच्च म्हणजे १२.५% राहील असे भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधिने करणे ही मोदी सरकारच्या अचूक आर्थिक धोरणांना मिळालेली पोचपावती आहे…” असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version