पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ७५ डिजिटल बँकिंग युनिट्सचा (डीबीयू) शुभारंभ केला आहे. बँकिंग सेवांमध्ये पारदर्शकता आणण्याचा आणि त्याचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प असल्याचे पंतप्रधानांनी डिजिटल बँकिंग युनिट्सचा शुभारंभ करताना सांगितले
भारतातील प्रति १००,००० प्रौढ लोकसंख्येमागे बँक शाखांची संख्या जर्मनी, चीन आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त आहे. यासोबतच ते म्हणाले की, डिजिटल बँकिंग युनिट्समुळे सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य होईल. या विशेष प्रकारच्या बँकिंग सुविधेचा डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अधिकाधिक लोकांना फायदा होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या स्मरणार्थ देशातील ७५ जिल्ह्यांमध्ये ७५ डीबीयू स्थापन करण्याची घोषणा केली होती.
डीबीयूच्या स्थापनेमागील सरकारचे उद्दिष्ट डिजिटल बँकिंगचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हे आहे. या योजनेत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश केला जाईल. सरकारच्या या प्रयत्नात ११ सरकारी बँका, १२ खाजगी बँका आणि एक लघु वित्त बँक सहभागी होत आहेत.
डीबीयू ग्राहकांना अतिशय स्वस्त दरात डिजिटल बँकिंग सुविधा प्रदान करेल. यासोबतच ते आर्थिक साक्षरता पसरवतील आणि लोकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करतील, असे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे.
हे ही वाचा
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले
‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’
रेल्वे गाड्यांनमधून पडून ४८७ प्रवाशांनी गमावले प्राण
या मिळतील सुविधा
लोक डिजिटल बँकिंग युनिट्सच्या आउटलेटवर बचत खाते उघडू शकतात, खात्यातील शिल्लक तपासू शकतात, पासबुक प्रिंट करू शकतात, निधी हस्तांतरण करू शकतात, एफडी उघडू शकतात, कर्जासाठी अर्ज करू शकतात, क्रेडिट आणि डेबिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. बिल भरणे आणि नावनोंदणी यासारख्या सुविधांचा लाभ घेता येतील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.