27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतआता इंटरनेटशिवाय मोबाईलवरच बघा टीव्ही

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवरच बघा टीव्ही

प्रसारणाची चाचणी घेण्याची योजना

Google News Follow

Related

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवर टीव्ही पाहणे शक्य होणार आहे. कारण सरकार डायरेक्ट टू मोबाईल सुविधेसाठी काम करत आहे. त्यामुळे फ्री-टू-एअर चॅनेल मोबाइलवर चालतील आणि वाय-फाय अँटेना म्हणून काम करतील. सरकार एफएम रेडिओ स्टेशन्सचा नवीन लिलाव, ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची आणि डायरेक्ट-टू-मोबाइल टेलिव्हिजन प्रसारणाची चाचणी घेण्याची योजना आखत आहे. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी ही माहिती दिली आहे. डायरेक्ट-टू-मोबाइल नेमके काय आहे हे जाणून घेऊया.

सध्या आपण सर्वच जण डीटीएच (डायरेक्ट टू होम ) डिशच्या मदतीने टीव्हीवर वेगवेगळे कार्यक्रम बघत आहोत, डायरेक्ट टू मोबाईल तंत्र नेमके त्याच पद्धतीने काम करणार आहे. कारण जसे डीटीएच आहे, तसेच डी २ एम आहे. या सुविधेमुळे तुम्ही आता तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेट कनेक्शनशिवाय टीव्ही पाहू शकणार आहात. हे एखाद्या एफएम रेडिओसारखे कार्य करेल. यामध्ये रोडिओ लहरी प्राप्त करता येऊ शकतील,.

सोप्या भाषेत सांगायचे तर, इंटरनेट, केबल किंवा डीटीएच शिवाय, तुम्हाला बातम्या, क्रिकेट इत्यादींचे थेट मोबाइल फोनवर व्हिडिओ प्रसारण करण्याची सुविधा मिळेल. इंटरनेटशिवाय थेट तुमच्या फोनवर हॉटस्टार सोनी लिव्ह, झी फाईव्ह, ऍमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्स पासून ते अन्य मल्टीमिडीयाचा अनुभव घेता येऊ शकेल.  या तंत्रज्ञानामुळे, बातम्या, खेळ आणि ओटीटी इंटरनेट कनेक्शनशिवाय थेट मोबाइलवर येईल. विशेष म्हणजे बफरिंगशिवाय चांगल्या गुणवत्तेच्या प्रसारणाचा आनंद घेता येईल. कारण ते कोणताही इंटरनेट डेटा घेणार नाही.

या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नागरिकांशी संबंधित कोणतीही विशिष्ट माहिती थेट त्यांच्या मोबाईलवर प्रसारित केली जाऊ शकते, ज्यामुळे फेक न्यूज रोखणे, आपत्कालीन अलर्ट जारी करणे आणि आपत्ती व्यवस्थापनात मदत होईल. मोबाइल फोन वापरणाऱ्यांना टेलिव्हिजन सिग्नल प्राप्त करण्यासाठी त्यांच्या मोबाइलमध्ये एक विशिष्ट डोंगल लावावा लागेल. डोंगलशिवाय टेलिव्हिजन सिग्नल प्राप्त करायचा असेल तर मोबाईलमध्ये एक विशिष्ट चिप बसवण्यासाठी मोबाईल उत्पादकांना प्रोत्साहित करावे लागेल.

हे ही वाचा:

गिरीश बापट यांच्यामुळे कसब्याचा गड मजबूत

स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदावरून चेतन शर्मा पायउतार

अधिक युक्तिवादाची गरज .. सत्तासंघर्षांवर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी

आईच्या निधनामुळे संतापून इंग्रजांविरुद्ध त्या तरुणाने बंडाचे निशाण उभारले!

“सध्या देशात सुमारे २० कोटी लोकांच्या घरी टेलिव्हिजन, ६० कोटी स्मार्टफोन वापरकर्ते आणि ८० कोटी ब्रॉडबँड वापरकर्ते आहेत. यामुळे टेलिव्हिजन उद्योगाला आणखी बळकटी मिळण्यास मदत होणार आहे . ब्रॉडकास्टर्सना डायरेक्ट-टू-मोबाइलचा फायदा होईल कारण त्यांना नवीन प्रेक्षक मिळणार आहेत. या संदर्भात आयआयटी -कानपूर आणि सांख्य लॅब्सने बेंगळुरूमध्ये डायरेक्ट-टू-मोबाइल ब्रॉडकास्टिंगचा प्रायोगिक अभ्यास केला आहे . नोएडा किंवा दिल्लीजवळ याचा अभ्यास करण्यात येत आहे असे अपूर्व चंद्र यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा