देशात नवीन आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची तयारी सुरु आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक पक्षाच्या अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यासाठी सरकार पुढील आठवड्यापासून अर्थसंकल्पपूर्व बैठका सुरू करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवार, २१ नोव्हेंबरपासून अर्थसंकल्पपूर्व बैठका सुरू करणार आहेत.
अर्थमंत्री अर्थसंकल्पापूर्वी विविध भागधारकांसोबत बैठका घेतात. सीतारामन २१ नोव्हेंबर रोजी तीन गटांमध्ये उद्योग चेंबर्स, पायाभूत सुविधा क्षेत्र आणि पर्यावरण तज्ञांसह बैठक घेणार आहेत. या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये २०२३-२४ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पासाठी विविध पक्षांकडून सूचना मागवल्या जाणार आहेत.
विशेष म्हणजे या अर्थसंकल्पीय बैठकांमध्ये हवामान बदल आणि पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष दिले जाणार आहे. यानंतर अर्थमंत्री २२ नोव्हेंबर रोजी कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योग, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजाराच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. पुढे २४ नोव्हेंबर रोजी त्या आरोग्य, शिक्षण, पाणी आणि स्वच्छता यासह सामाजिक क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करणार आहेत. त्याच दिवशी त्यांच्या सेवा क्षेत्र आणि व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधींना भेटण्याचा कार्यक्रमही आहे. त्यानंतर कामगार संघटना आणि अर्थतज्ज्ञांच्या प्रतिनिधींसोबत २८ नोव्हेंबरला अर्थसंकल्पपूर्व बैठक होणार आहे.
हे ही वाचा :
स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न
श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह
धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले
राहुल गांधींनी शेगावमध्ये सावरकरांबद्दल बोलणे टाळले
सर्वसाधारपणे या बैठकांमध्ये अर्थसंकल्पाबाबत सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. अर्थमंत्री १ फेब्रुवारी २०२३ ला संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेची वाढ कायम ठेवण्यासाठी पावले उचलली जाणार, असल्याचं सीतारामन यांनी सांगितले आहे.