Budget 2022 : भारतातील सर्व पोस्ट ऑफिसेस बँकिंग प्रणालीशी जोडणार

Budget 2022 : भारतातील सर्व पोस्ट ऑफिसेस बँकिंग प्रणालीशी जोडणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरातील पोस्टात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा बजेट दरम्यान केली. त्यांनी ही पोस्ट कार्यालये आणि बँकिंग प्रणाली एकमेकांशी जोडली जातील अशी घोषणा केली.

त्या म्हणाल्या की, भारतातील १.५ लाख डाक कार्यालये बँकिंग प्रणालीशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे पोस्टात गुंतवणूक करणाऱ्यांना आपल्या खात्याची माहिती ऑनलाइन तपासणे, त्यात व्यवहार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे या डिजिटल पद्धतीने आपल्या पोस्ट खात्यात पैसे भरणेही लोकांना शक्य होणार आहे.

हे ही वाचा:

विद्यार्थ्यांना भडकवल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊला अटक

हॉटेल व्यावसायिकांना दिलासा; सिलिंडरच्या दरात ९१ रुपयांची कपात

नवाब मलिकांवर सात दिवसात गुन्हा दाखल होणार

Budget 2022 : अर्थव्यवस्थेला मिळणार नवी ‘गती शक्ती’

 

२०२२मध्ये ही सगळी दीड लाख पोस्ट ऑफिसेस बँकिंग प्रणालीशी जोडली जातील अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्यामुळे नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग याद्वारे आपल्या खात्यात बँक खात्यातून पोस्ट खात्यात पैसे जमा करणे शक्य होणार आहे. ही व्यवस्था प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरेल. शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना पोस्टात जाऊन पैसे भरण्याची गरज राहणआर नाही.

सध्या पोस्टाच्या माध्यमातून बचत खात्याची सेवा आणि पेमेंट बँक सर्व्हिसेस उपलब्ध केल्या जातात. पण आता पोस्टात गुंतवणूक करणाऱ्यांचा मार्ग डिजिटल होणार आहे.

Exit mobile version