भारताने कोळसा उत्पादनामध्ये १ अब्ज टनचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा देशासाठी ‘गौरवशाली क्षण’ असल्याचे सांगितले. ही उपलब्धी देशाच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक बळकटी देईल आणि विद्युत निर्मितीतील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, असे मोदी म्हणाले. सतत आणि जबाबदारीने खाणकाम करण्यावर भर देऊन उत्पादन वाढवण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या एक्स पोस्टला रीशेअर करत लिहिले,
“भारतासाठी अभिमानाचा क्षण! १ अब्ज टन कोळसा उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा पार करणे ही एक मोठी उपलब्धी आहे.
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी एक्स पोस्टमध्ये सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल खाण प्रक्रियांमुळे उत्पादन वाढले आहे. ही उपलब्धी वाढत्या वीज मागणीस पूरक ठरेल आणि आर्थिक वाढीला गती देईल.
हे ही वाचा:
मायग्रेनपासून मुक्ती देणारे ‘स्वर्गीय झाड’
पाकिस्तानचा भारतावर आरोप, म्हणाले दहशतवादाला प्रोत्साहन देतो!
वीजपुरवठा खंडित झाल्याने लंडनमधील हीथ्रो विमानतळ बंद
मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटींची खंडणी घेताना अटक
पीएम मोदींनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ही उपलब्धी ऊर्जा सुरक्षितता, आर्थिक प्रगती आणि आत्मनिर्भरतेची वचनबद्धता दर्शवते. कोळसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच हे शक्य झाले आहे.” केंद्र सरकारने वित्तीय वर्ष २०२५-२६ मध्ये वीज क्षेत्रासाठी ९०६.१ मिलियन टन कोळसा पुरवठ्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. कोळसा मंत्रालयाने संसदेत ही योजना सादर केली असून, विद्युत मंत्रालयाच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या देशात कोळशाचा मुबलक साठा उपलब्ध
१० मार्च २०२५ पर्यंत देशातील कोळसा आधारित वीज निर्मिती प्रकल्पांकडे ५३.४९ दशलक्ष टन साठा उपलब्ध होता.
हा साठा मागील वर्षी याच तारखेला असलेल्या ४४.५१ मिलियन टनांपेक्षा २०.२% जास्त आहे.