पोलाद उत्पादनात ‘सेल’चे विक्रमी उत्पादन

कंपनीच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

पोलाद उत्पादनात ‘सेल’चे विक्रमी उत्पादन

पोलाद उत्पादनात आघाडीवर असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या महारत्न कंपनीने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात विक्रमी उत्पादन केले आहे.

कंपनीच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सेल कंपनीने १९.४०९ दशलक्ष टन गरम धातू आणि १८.२८९ दशलक्ष टन कच्च्या पोलादाचे उत्पादन केले आहे. या दोन्ही उत्पादनामध्ये अनुक्रमे ३.६% आणि ५.३ % वाढ नोंदवली आहे. अधिक मूल्यवर्धित आणि विशेष पोलाद उत्पादनावर लक्ष केंद्रित करून ही कंपनी वर्षानुवर्षे आपले उत्पादन सातत्याने वाढवत आहे.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने जानेवारी महिन्यातही सर्वाधिक मासिक उत्पादन नोंद केली होती. या वर्षाच्या जानेवारीमध्ये १.७२ दशलक्ष टन क्रूड स्टीलचे आतापर्यंतचे सर्वाधिक मासिक उत्पादन नोंदवले. तर यापूर्वीचे सर्वोच्च मासिक उत्पादन मार्च २०२२मध्ये होते. सेलने जानेवारी २०२३ मध्ये १.८ दशलक्ष टन हॉट मेटल आणि १.६१ दशलक्ष टन विक्रीयोग्य स्टीलचे आतापर्यंतचे सर्वाधिक मासिक उत्पादन मार्च २०२२ च्या आधीच्या सर्वोच्च मासिक उत्पादनाची नोंद केली होती. सेल कंपनीने ट्विट करून हि माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट रिट्विट करून सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी हिंदीत ट्विट केले की, केवळ स्टीलच नाही तर आज भारत सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. सेल ने गेल्या आर्थिक वर्षात १९.४दशलक्ष टनांहून अधिक गरम धातू आणि १८.२ दशलक्ष टनांहून अधिक क्रूड स्टीलचे उत्पादन केले आहे. वार्षिक आधारावर, कंपनीचे हॉट मेटल उत्पादन ३.६ टक्के आणि क्रूड स्टीलचे उत्पादन ५.३ टक्क्यांनी वाढले. सोलर रूफटॉप ऑनलाइन पोर्ट आणि जल जीवन मिशनवर पंतप्रधानांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांना धमकीदेवेंद्र फडणवीसांचा धमाका…

प्रा. सु. ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे कालवश

अमृता फडणवीस खंडणी प्रकरणी ‘बुकी’ अनिल जयसिंघानीचा जामीन नाकारला

सदाबहार, रुबाबदार क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागाच्या सहकार्याने विकसित केलेल्या सोलर रूफटॉप ऑनलाइन पोर्टलवरही मोदींनी आपली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर पंतप्रधान म्हणाले की, सौरऊर्जेचा वापर करण्याच्या दिशेने हे एक चांगले पाऊल आहे.

Exit mobile version