सात राज्यांपैकी महाराष्ट्रात अमरावतीत उभे राहतेय टेक्स्टाइल पार्क

वस्त्रोद्योग क्षेत्रात आतापर्यंत सुमारे१,५३६ कोटी रुपयांची गुंतवणूक

सात राज्यांपैकी महाराष्ट्रात अमरावतीत उभे राहतेय टेक्स्टाइल पार्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथील मेगा टेक्स्टाईल पार्कला मंजुरी दिली आहे. केवळ महाराष्ट्र नाही तर अन्य राज्यतही मेगा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये ‘पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्क’ उभारले जातील.

या उद्यानांमुळे वस्त्रोद्योगासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या उद्यानांमुळे कोट्यवधींची गुंतवणूक आकर्षित होईल आणि लाखो रोजगार निर्माण होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्क वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. यामध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यात येईल आणि लाखो रोजगार उपलब्ध होतील.’मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’चे हे उत्तम उदाहरण असेल असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने २०२७-२८ पर्यंत ४,४४५ कोटी रुपयांच्या खर्चासह जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ७ पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल पार्कची (पीएम मित्रा) पार्कची स्थापना करण्यास मान्यता दिली होती. प्रॉडक्ट लिंक इन्सेन्टिव्हमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात आतापर्यंत सुमारे१,५३६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.आत्मनिर्भर योजनेचा एक भाग म्हणून, सरकारने भारतीय उत्पादकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, निर्यात वाढवण्यासाठी,आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी प्रॉडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सुरु केली आहे.

हे ही वाचा:

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…

तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण

भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?

वस्त्रोद्योग क्षेत्रात पीएलआय योजनेअंतर्गत १ जानेवारी २०२२ ते२८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत पोर्टलद्वारे एकूण ६७ अर्ज प्राप्त झाले. वस्त्र सचिवांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ६४अर्जदारांची निवड केली. त्यापैकी ५६ अर्जदारांनी नवीन कंपनी स्थापनेसाठी अनिवार्य निकष पूर्ण केले आहेत. या अर्जदारांना मंजुरीची पत्रे देण्यात आली असल्याचं वस्त्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

Exit mobile version