‘सीआरई मॅट्रिक्स’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईकरांनी गुंतवणूक म्हणून मालमत्ता खरेदीला सुरुवात केली आहे. मध्य मुंबईतील लोकांचा दक्षिण मुंबईत मालमत्ता खरेदीसाठी कल जास्त आहे,.
पश्चिम उपनगरातील लोक पूर्व उपनगरांत मालमत्ता खरेदीसाठी उत्साह दाखवत असल्याचे चित्र आहे. कोरोना संकटात इतर गुंतवणूक पर्याय कमकुवत झाल्याने लोकांचा मालमत्ता खरेदीकडे ओढा वाढला आहे.
संस्थेच्या सर्वेक्षणानुसार दक्षिण मुंबईत मालमत्ता खरेदीला मोठी मागणी आहे, पण खरेदी करणारे बहुसंख्य लोक हे मध्य मुंबईतील आहेत. एकूण खरेदीदारांपैकी ३७ टक्के ग्राहक हे मध्य मुंबईतील आहेत. दक्षिण मुंबईतील ऑपेरा हाऊस, गिरगाव, चिंचपोकळी, जेकब सर्कल, मशीद बंदर आणि माझगाव हे परिसर खरेदीदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे आहेत. मध्य मुंबईतील २० टक्के खरेदीदार हे दादर, लालबाग भागातील आहेत. लालबाग, शिवाजी पार्क आणि लोअर परेल हे येथील आवडीचे भाग आहेत.
हे ही वाचा:
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली
महिला पोलिस शिपायानेच काढला आपल्या पोलिस सहकाऱ्याचा ‘काटा’
बायकोच्या त्रासामुळे त्याचे २० किलो वजन घटले!
प.बंगालमधील भाजपा खासदाराच्या घराबाहेर कुणी फेकले क्रूड बॉम्ब?
मध्य उपनगरांत मालमत्ता खरेदी करणारे २५ टक्के खरेदीदार हे कुर्ला, सायन भागातील आहेत. कुर्ला, वांद्रे पूर्व, सायन आणि चुनाभट्टी या भागात मालमत्ता खरेदी करण्याचा कल जास्त आहे. पश्चिम उपनगरांत तेथील ग्राहकच मालमत्ता खरेदी करत असल्याचे चित्र आहे. २२ टक्के ग्राहक हे कांदिवली आणि चारकोप परिसरातील आहेत. कांदिवली पश्चिम, चारकोप, कांदिवली पूर्व व मालाड पूर्व हे परिसर ग्राहकांच्या खरेदीसाठी पसंतीची ठिकाणे आहेत. पूर्व उपनगरांत येणारे ग्राहक हे जास्त पश्चिम उपनगरांतील आहेत. शांततामय परिसर निवडण्यासाठी हे खरेदीदार भांडुप पश्चिम, मुलुंड पश्चिम, घाटकोपर, चेंबूर व पवई अशा परिसरांना पसंती देत आहेत.