ऑनलाइन पेमेंटच्या बाबतीतली भारतातील मोठी कंपनी पेटीएमसाठी एक खुशखबर आली आणि कंपनीचे सीईओ ऑफिसमध्येच नाचू लागले. ही बातमी होती पेटीएमच्या आयपीओला (IPO) अर्थात इनिशियल पब्लिक ऑफरला हिरवा कंदील मिळाल्याची. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी (SEBI) ने पेटीएमच्या आयपीओला मान्यता दिली आहे. त्यामुळे पेटीएम कर्मचाऱ्यांमध्ये आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या आयपीओच्या माध्यमातून पेटीएम कंपनी आपल्या आगामी कार्यासाठी पैसा उभा करणार आहे. हा भारतातील सर्वात मोठ्या आयपीओ पैकी एक असणार आहे. ज्याच्या माध्यमातून कंपनी तब्बल १६,६०० करोड रुपये उभारणार आहे. कंपनीच्या या महत्त्वाकांक्षी आयपीओला सेबीने मान्यता दिल्याचे समजले आणि या कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा हे आनंदाने कार्यालयातच नाचू लागले.
हे ही वाचा:
… म्हणून त्याने मारली राज्यपालांच्या कानशिलात!
नाशिकमधील शिवसैनिकांना पडला उद्धव ठाकरेंचा विसर!
कुणाल जानी कलानगरमधील मंत्र्याच्या जवळचा
मला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, वानखेडे यांनी लिहिले पत्र
आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी विजय शेखर शर्मा यांच्या नाचण्याचा हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. आपल्या ट्विटमध्ये हर्ष गोएंका म्हणतात भारतातल्या आजवरच्या सर्वात मोठ्या आयपीओपैकी एकाला सेबीने मान्यता दिल्यानंतर पेटीएम ऑफिस मधला सीन. या व्हिडिओमध्ये कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा हे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या लावारिस चित्रपटातील टअपनी तो जैसे तैसेट या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायक किशोर कुमार यांनी हे गाणे गायले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Scenes at Paytm office after SEBI approves one of India’s largest IPOs 😀😀@vijayshekhar pic.twitter.com/6yQHKVBm39
— Harsh Goenka (@hvgoenka) October 24, 2021