मुंबईकरांना उन्हाळ्याचा तडाखा जाणवू लागला आहे. गेल्या एक आठवड्यापासून मुंबईत उकाडा वाढला आहे. या उकाड्याचा सकारात्मक परिणाम एसी लोकलवर दिसून येत आहे. आतापर्यंत ज्या एसी लोकलच्या दिवसभरात रिकाम्या फेऱ्या व्हायच्या आज त्या एसी लोकल प्रवाशांनी भरून वाहत आहेत.
वाढत्या उन्हाच्या झळा पाहता प्रवाशांनी एसी लोकलचे सिझन पास काढण्यास सुरवात केली आहे. रोजच्या रोज तिकीट काढण्यापेक्षा प्रवाशी एसी लोकलच्या पासला पसंती देत आहेत. सध्या मध्य रेल्वेवर दिवसभरात एसी लोकलच्या ६० फेऱ्या होत आहेत. १ मार्च पासून मुंबईकरांना उकाड्याची जाणीव होऊ लागली आहे. तेव्हापासून म्हणजेच १ मार्च ते ७ मार्चच्या कालावधीत एसी लोकलने ६९ लाख ५३ हजार रुपयांची कमाई केली आहे. त्यामध्ये सिझन तिकिटांद्वारे मिळालेल्या २७ लाख ९९ हजार रुपयांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेवर विशेषतः ठाणे ते दिवा दरम्यान एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या नवीन वेळापत्रकात ३६ फेऱ्यांची वाढ करण्यात आली असून त्यात तब्बल ३४ एसी फेऱ्यांचा समावेश आहे. एसी लोकलच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण, बल्लापूर, टिटवाळा या विभागामध्ये ४४ फेऱ्या चालवण्यात येत आहेत. तर पश्चिम हार्बर मार्गावर सीएसएमटी ते गोरेगाव आणि हार्बरच्या सीएसएमटी ते पनवेल मार्गावर प्रतयेकी ८ फेऱ्या चालवल्या जात आहेत.
हे ही वाचा:
‘कळसूत्री सरकारचा पंचसूत्री अर्थसंकल्प’
कर्णावती येथे रा.स्व.संघाची प्रतिनिधी सभा
ठाकरे सरकारने सादर केला अर्थसंकल्प
हा तर उधारीचा वायदा करणारा अर्थसंकल्प
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सात दिवसांत मध्य रेल्वेच्या सुमारे ८७ हजार १७८ प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे.