सणासुदीत वाहन विक्रीचा ‘थर्ड गिअर’ 

घाऊक विक्रीत वर्षभराच्या तुलनेत ९२ टक्क्यांनी वा

सणासुदीत वाहन विक्रीचा ‘थर्ड गिअर’ 

सणासुदीच्या काळात प्रवासी वाहनांच्या विक्रीत जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. मजबूत मागणीमुळे, गेल्या महिन्यात देशातील प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत वर्षभराच्या तुलनेत ९२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स  या वाहन निर्मात्यांच्या संघटनेने ही माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात ३,०७,३८९ प्रवासी वाहनांची विक्री झाली आह. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने विक्रीत वाढ झाल्याचे सियामने म्हटले आहे.गेल्या वर्षी याच महिन्यात म्हणजेच सप्टेंबर २०२१ मध्ये १,६०,२१२ प्रवासी वाहनांचे वितरण  विक्रेत्यांना  करण्यात आले.

सियामच्या आकडेवारीनुसार यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये दुचाकींची विक्री १३ टक्क्यांनी वाढून १७,३५,१९९ युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षात याच काळात १५,३७,६०४  वाहनांची विक्री झाली होती. या कालावधीत मोटारसायकलींची विक्री १८ टक्क्यांनी वाढून ११,१४,६६७ युनिट्सवर पोहोचली.  मागील महिन्यात स्कूटर विक्री ९ टक्क्यांनी वाढून ५,७२,९१९ युनिट्सवर पोहोचली. मागील वर्षात सप्टेंबरमध्ये ५,२७,७७९ स्कूटर्सची विक्री झाली होती.

हे ही वाचा:

मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक

इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक

ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा

उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

तिमाही आधारावर ३८ टक्के  वाढ

चालू आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर या तिमाहीत प्रवासी वाहनांची विक्री ३८ टक्क्यांनी वाढून १०,२६,३०९  युनिट झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत हा आकडा ७,४१,४४२ होता. सर्व श्रेणींमध्ये एकूण विक्री वाढून ६०,५२,६२८  वाहनांवर गेली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत हा आकडा ५२,१५,११२ वाहनांची विक्री झाली होती.

Exit mobile version