34 C
Mumbai
Friday, November 8, 2024
घरअर्थजगतचिपचा तुटवडा संपला आणि मोटारींचा वाढला वेग.. विक्रीत दणदणीत वाढ

चिपचा तुटवडा संपला आणि मोटारींचा वाढला वेग.. विक्रीत दणदणीत वाढ

गेल्या महिन्यात वाहनांची एकूण १६,३७,०४८ वाहनांची घाऊक विक्री

Google News Follow

Related

देशातील वाहन उद्योगाच्या वाढीला चिपचा तुटवडा हा मोठा अडसर ठरत होता. पण आता मोटारीमधील महत्वाचा भाग असलेल्या चिपच्या कमतरतेचा तिढा मिटला आणि देशातील वाहन विक्रीने पुन्हा एकदा गती पकडली आहे. २०२२-२३ वर्षमध्ये देशातील वाहनांच्या विक्रीत २६.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एसयूव्हीला आलेल्या मागणीमुळे या विक्रीत आणखी भर पडली आहे.

विशेष म्हणजे या वर्षात महागाईचे वातावरण असतांनाही चिप चिपचा तुटवडा संपला आणि मोटारींचा वाढला वेग.. गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत दणदणीत वाढ झालेली सुधारणा , विशेषत: एसयूव्हीसाठी वाढती मागणी आणि सोबतच नवीन इंधन उत्सर्जन निकषांच्या अंमलबजावणीपूर्वी खरेदीचा वाढलेला वेग यामुळे वाहन उद्योगासाठी हे वर्ष विक्रीच्यादृष्टीने चांगले ठरले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ वर्षात देशांतर्गत घाऊक विक्री मार्चमध्ये ४.७ टक्क्यांनी वाढून २,९२,०३० प्रवासी वाहनांवर गेली आहे. गेल्या वर्षात याच काळात २,७९,५२५ मोटारींची विक्री झाली होती.

वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम ) ही माहिती दिली आहे . गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रवासी वाहनांची विक्री २,७९,५२५ इतकी होती. देशात गेल्या महिन्यात १२,९०,५५३ दुचाकींची विक्री झाली. मागील वर्षी ११,९८,८२५ दुचाकी विक्री झाली होती. गेल्या महिन्यात वाहनांची एकूण १६,३७,०४८ वाहनांची घाऊक विक्री झाली होती. मार्च २०२२ मध्ये १५,१०,५३४ वाहनांची विक्री झाली होती. देशांतर्गत बाजारपेठेत ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात प्रवासी वाहनांची विक्री ३८,९०,११४ पर्यंत वाढली. २०२१-२२ मध्ये ३०,६९५२३ वाहनांची विक्री झाली होती.

सियाम च्या आकडेवारीनुसार २०२२-२३ मध्ये १,५८,६२,०८७ दुचाकींची घाऊक विक्री अली होती. २०२१-२२ मध्ये १,३५,७०,००८ दुचाकींची विक्री झाली होती. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये, विविध श्रेणींत एकूण २,१२,०४,१६२ वाहनांची विक्री झाली आहे. २०२१-२२ मध्ये १,७६,१७,६०६ वाहनांची विक्री झाली होती.

हे ही वाचा:

राहुल गांधींच्या विरोधात ‘सावरकर’ न्यायालयात

गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीवर युएपीए अंतर्गत कारवाई

ढलती का नाम महाविकास आघाडी मन्नू तेरा हुवा, अब मेरा क्या होगा?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘आंबेडकर यात्रा ट्रेन

प्रवासी वाहनांच्या विक्रीचा विक्रम
प्रवासी वाहनांची २०२२-२३ या वर्षात प्रवासी वाहनांची विक्री विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. या वर्षांमध्ये ४. ५दशलक्ष प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. ही विक्री आधीच्या उच्च पातळीपेक्षा जास्त आणि आतापर्यंतची सर्वाधिक देशांतर्गत विक्री आहे. २०१८-१९ मध्ये २१. २ दशलक्ष दुचाकींची विक्री झाली होती. हि विक्री २०२२-२३ या वर्षात १५ दशलक्ष इतकी खाली आली आहे म्हणजेच जवळपास २५ % ची घट झाली आहे. ही काहीशी चिंतेची बाब आहे पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रमध्य वाढ झालेली असल्याचे सियाम संस्थेने म्हटले आहे.

मोटारसायकलची विक्री घटली
सियांच्या म्हणण्यानुसार ११० सीसीमोटारसायकलींची विक्री घटली आहे. याची कारण अनेक असू शकतात. लोक दुचाकी खरेदीचा निर्णय पुढे ढकलत असतील. परंतु दुचाकी आवश्यक असल्याने विक्री वाढेल आणि मागणी परत येईल अशी अपेक्षा सियामने व्यक्त केली आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा