प्रवासी वाहनांच्या विक्रीला मिळाली भरघोस गती

सेमीकंडक्टर पुरवठ्यात सुधारणांचा परिणाम ; २१ % वाढ

प्रवासी वाहनांच्या विक्रीला मिळाली भरघोस गती

ऑगस्ट २०२२ मध्ये प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत २१ टक्क्यांनी वाढली आहे, सेमीकंडक्टर पुरवठ्यात झालेली वाढ आणि सणासुदीच्या मागणीमुळे हि वाढ झाली असल्यावे म्हटल्या जात आहेत. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे.

आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये २,३२,२२४ युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात २,८१,२१० प्रवासी वाहने वितरकांना पुरवण्यात आली होती. गेल्या महिन्यात प्रवासी कारची घाऊक विक्री २३ टक्क्यांनी वाढून १,३३,४७७ युनिट्सवर पोहोचल्याचे सियामने म्हटले आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते १,०८,५०८ युनिटची विक्री झाली होती . युटिलिटी वाहनांचा पुरवठा ऑगस्टमध्ये २० टक्क्यांनी वाढून १,३५,४९७ युनिट्सवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच महिन्यात १,१२,८६३ वाहनांचा पुरवठा करण्यात आला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १३,३८,७४० वाहनांचा पुरवठा झाला होता

सियामच्या म्हणण्यानुसार, या वर्षी ऑगस्टमध्ये विभागांमधील विक्री १८ टक्क्यांनी वाढून १८,७७,०७२ युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा आकडा १५,९४,५७३ युनिट होता. सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने पुरवठ्यात वाढ झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.चांगला मान्सून आणि आगामी सणासुदीच्या हंगामामुळे मागणी वाढण्याची शक्यता सियामने व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा

पिंपरीत गायब झालेल्या मुलाची हत्या

जम्मू आणि काश्मीर पुनर्वसन योजना लागू

‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’

 

दुचाकी विक्रीत १६ टक्क्यांची वाढ

त्याचप्रमाणे, गेल्या महिन्यात एकूण दुचाकी घाऊक विक्री १६ टक्क्यांनी वाढून १५,५७,४२९ युनिट्सवर पोहोचली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये १३,३८,७४० दुचाकींची विक्री झाली होती. गेल्या महिन्यात मोटारसायकलींची घाऊक विक्री २३ टक्क्यांनी वाढून १०,१६,७९४ युनिट्सवर गेली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ८,२५,८४९ मोटारींची विक्री झाली होती. गेल्या महिन्यात १० टक्के वाढीसह ५,०४,१४६ स्कूटर विकल्या गेल्याचे सियामने म्हटले आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये ही संख्या ४,६०,२८४ युनिट्स होती.

Exit mobile version