चिपची स्थिती सुधारल्यामुळे जुलैमध्ये प्रवासी वाहनांच्या वितरणात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यातील सुधारणांमुळे कंपन्यांना सणासुदीच्या आधी उत्पादन वाढवण्यास मदत झाल्यामुळे जुलैमध्ये वितरकांकडे प्रवासी वाहन पाठवण्याचे प्रमाण ११ टक्क्यांनी वाढले आहे, असे सियाम या वाहन कंपन्यांच्या शिखर संस्थेनं म्हटलं आहे.
एकूण प्रवासी वाहनांची घाऊक विक्री जुलै २०२१ मध्ये २,६४,४४२ युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात २,९३,८६५ युनिट्सपर्यंत वाढली आहे. जुलैमध्ये प्रवासी कार वितरण वाढून १,४३,५२२ युनिट्सवर पोहोचले आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत१,३०,०८० युनिट्स होते. युटीलीटी वाहनांची घाऊक विक्री गेल्या महिन्यात १,२४,०५७ युनिट्सवरून ११ टक्क्यांनी वाढून १,३७,१०४ युनिट झाली. व्हॅन वितरण देखील जुलै २०२१ मधील १०,३०५ युनिट्सवरून १३,२३९ युनिट्सपर्यंत वाढली. एकूण दुचाकी वितरण १०टक्क्यांनी वाढून १३, ८१, ३०३ युनिट्सवर पोहोचले.
हे ही वाचा:
नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या
धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या
समीर वानखेडेंना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीनचीट
उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIA कडून दहाव्या आरोपीला अटकnews
वाहनांच्या वितरणात सुधारणा
प्रवेश पातळीवर प्रवासी कार, दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांच्या बाजारपेठेत अद्याप सुधारणा होणे बाकी आहे.जुलै २०२२ मधील दुचाकींची विक्री अद्यापही जुलै २०१६ पेक्षा कमी आहे आणि तीनचाकी वाहनांची विक्री जुलै २००६ पेक्षा कमी आहे. पुरवठा साखळीतील सुधारणांमुळे गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांच्या वितरणात सुधारणा झाली आहे. असं सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) चे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितलं
उत्पादन खर्च कमी होईल
सीएनजी विभागासाठी घरगुती गॅसची जास्त रक्कम वाटप करण्याच्या निर्णयामुळे गॅस कंपन्यांच्या उत्पादन खर्चात लक्षणीय घट होईल. आम्हाला आशा आहे की सरकारच्या हेतूनुसार, गॅस कंपन्या किरकोळ सीएनजीच्या किमती कमी करून संपूर्ण फायदा अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवतील, असेही मेनन म्हणाले