पार्ले बिस्कीट आता सातासमुद्रापलिकडे झेपावणार

पोलंडची डॉ. जेरार्ड कंपनी खरेदी करण्याची चर्चा

पार्ले बिस्कीट आता सातासमुद्रापलिकडे झेपावणार

बाजारात विविध प्रकारची बिस्किटे आज उपलब्ध आहेत. तरी पण चहा पिताना आठवते ते पार्ले बिस्किटच. घराघरात पोहोचलेला हा ब्रँड आता लवकरच सातासमुद्रापार जाण्याच्या तयारीत आहे . सर्व काही सुरळीत राहिल्यास, पार्ले लवकरच डॉ. जेरार्ड या पोलिश कंपनीची खरेदी करू शकते . २०१३ मध्ये ब्रिजपॉईंटने डॉ जेरार्ड कंपनीची फ्रान्सच्या ग्रुप पॉल्टकडून खरेदी केली होती. १९९३ मध्ये स्थापन झालेली डॉ. जेरार्ड्स कंपनी २०० पेक्षा जास्त विविध प्रकारचे बिस्किट आणि चवदार स्नॅक्सचे उत्पादन करते. ही कंपनी ३० पेक्षा जास्त अधिक देशांमध्ये निर्यात करते.

सध्या पार्ले कंपनीची ब्रिजपॉईंट कंपनीशी याबाबत चर्चा सुरू आहे. पोलंडस्थित या बिस्किट उत्पादक कंपनीचे एकूण मूल्य १०००-१२०० कोटी रुपये आहे. डॉ जेरार्ड कंपनी ब्रिजपॉईंटने २०१३ मध्ये विकत घेतली त्यावेळी ही कंपनी कोणत्या किंमतीला विकत घेतली हे स्पष्ट झाले नव्हते. ब्रिजपॉईंटने या वर्षाच्या सुरुवातीला डॉ गेरार्डमधून बाहेर पडण्यासाठी गुंतवणूक बँक हौलिहान लोकीची नियुक्ती केली, परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे ही प्रक्रिया सुरू झाली नाही.

हे ही वाचा:

एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची गोड बातमी

दीड महिन्यात १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेचा लाभ

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?

या कराराबद्दल पार्ले, ब्रिजपॉईंट किंवा डॉ जेरार्डकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पोलंडच्या या बिस्किट निर्माता कंपनीची अंदाजे किंमत १० ते १२ अब्ज रुपये आहे. त्याच वेळी, या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीचे म्हणणे आहे की या बिस्किट मेकरची किंमत २४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते.

१९२९ मध्ये विलेपार्लेच्या चौहान कुटुंबाने पार्ले-जीची सुरुवात केली. त्याच वेळी, कंपनीने पहिल्यांदा १९३८ मध्ये पार्ले-ग्लुको नावाने बिस्किटांचे उत्पादन सुरू केले. स्वातंत्र्यापूर्वी पार्ले-जीचे नाव ग्लुको बिस्किट होते. पण, १९८० नंतर त्याला नवीन नाव देण्यात आले.

Exit mobile version