27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरअर्थजगतआर्थिक तंगीने पाकिस्तान बेजार, आता चलनसाठा आटू लागला

आर्थिक तंगीने पाकिस्तान बेजार, आता चलनसाठा आटू लागला

Google News Follow

Related

आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा झपाट्याने कमी होत आहे. गुरुवारी पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत ९.६ टक्क्यांनी घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपया २५५.४ रुपयांवर थांबला. परकीय चलन साठ्यात पहिल्यांदाच एवढी मोठी घट दिसून आली असल्याचे जाणकारांचे मत आहे.

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून लवकर कर्ज मिळण्याची शक्यता नाही. परकीय चलनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. या आर्थिक वर्षात पाकिस्तानला सुमारे आठ अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे. पाकिस्तान त्यांच्या अटी मान्य करत नाही तोपर्यंत १.६ अब्ज डॉलर्सच्या कर्जाचा पुढचा टप्पा मिळणार नाही असे नाणेनिधीने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून ६ हप्त्यांमध्ये ९ अब्ज डॉलर्सचे कर्ज द्यायचे होते. आतापर्यंत तीन अब्ज डॉलर्सचे दोनच हप्ते देण्यात आले आहेत.स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने आपल्या ताज्या चलनविषयक धोरणाच्या दस्तऐवजात हे मान्य केले आहे की विदेशी दायित्वे पूर्ण करण्याच्या आघाडीवर पाकिस्तानची आव्हाने वाढत आहेत.

हे ही वाचा:

दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात ‘नारीशक्ती’चं अद्भुत दर्शन

१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी

लव्ह जिहादचे नेमके चित्रण करणाऱ्या ‘आवरण’ कादंबरीचे लेखक भैरप्पांना पद्मभूषण

पंतप्रधान मोदींनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली

सरकारी आकडेवारीनुसार, पाकिस्तानला या आर्थिक वर्षात विदेशी कर्जदारांना २३ अब्ज डॉलर्सची परतफेड करायची आहे. यातील १५ अब्ज डॉलरची जबाबदारी त्यांनी पूर्ण केली आहे. त्याला उर्वरित आठ अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे. याशिवाय चालू खात्यावरील दायित्वे आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या आर्थिक वर्षात पाकिस्तानची चालू खात्यातील तूट नऊ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची टीम जानेवारीच्या अखेरीस पाकिस्तानला भेट देणार आहे.  इम्रान खान यांच्या सरकारच्या काळात पाकिस्तानने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सोबत कर्ज करारावर स्वाक्षरी केली होती

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा