मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांना ‘पद्मभूषण’

हा पुरस्कार त्यांना अमेरिकेत प्रदान करण्यात आला

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांना ‘पद्मभूषण’

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना अमेरिकेत प्रदान करण्यात आला आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारताचे कौन्सुल जनरल डॉ. टीव्ही नागेंद्र प्रसाद यांनी नडेला यांना औपचारिकपणे हा सन्मान प्रदान केला. भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण मिळणे आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केली आहे. नाडेला यांनी पुढील वर्षी जानेवारीमध्ये भारताला भेट देण्याची योजना आखली आहे.

मला संपूर्ण भारतातील लोकांसोबत एकत्र काम करायचे आहे, जेणेकरून ते तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक साध्य करू शकतील. पद्मभूषण मिळणे आणि अनेक असाधारण लोकांसोबत ओळख मिळणे हा सन्मान आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारतातील जनतेचा मी आभारी आहे. मी भारतभरातील लोकांसोबत काम करत राहण्यासाठी त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक यश मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे असेही ते म्हणाले.

हैदराबादमध्ये जन्मलेले नाडेला फेब्रुवारी २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ बनले आणि जून २०२१ मध्ये त्यांना कंपनीचे अध्यक्षही बनवण्यात आले. ५५ वर्षीय सत्य नाडेला यांना मिळालेला पद्म पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे, जो दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केला जातो.पंतप्रधानांनी दरवर्षी स्थापन केलेल्या पद्म पुरस्कार समितीने केलेल्या शिफारशींवर पद्म पुरस्कार दिले जातात.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

 

सत्या नाडेला आणि डॉ. टीव्ही नागेंद्र प्रसाद यांनी भारतातील सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर चर्चा केली. पुढील दशक डिजिटल तंत्रज्ञानाचे असेल. प्रत्येक भारतीय उद्योग आणि संस्था तंत्रज्ञानाकडे वळत आहेत जे नावीन्य, संघर्षशीलता आणि कार्यक्षमतेला चालना देईल अशी आशा नाडेला यांनी बैठकीनंतर बोलताना व्यक्त केली.

Exit mobile version