सध्याच्या कोविड काळामध्ये लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सिनेमागृहे अजूनही बंद आहेत. त्यामुळे लोकांनी ओटीटीला पसंती दिली आहे. यामुळे आरबीएसए अहवालामध्ये भारतातील ओटीटी अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 12.5 बिलीयन पर्यंत वाढेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. सध्या ही अर्थव्यवस्था 1.5 बिलीयन डॉलर एवढी आहे.
या अहवालामध्ये भारतातील ओटीटीला छोट्या शहरांकडून पसंती मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यमध्ये प्रामुख्याने दुसऱ्या किंवा तिसऱ्या टायरमधील शहरांकडून पसंती मिळेल असे सांगितले जात आहे.
ओटीटी उद्योगातील विकास हा मोठ्या प्रमाणातील चांगल्या प्रतीच्या नेटवर्क आणि इत्यादी सुविधांच्या विकासामुळे होत आहे. त्याबरोबरच स्मार्टफोनच्या विकासामुळे देखील ओटीटीला पसंंती मिळत असल्याचे सांगितले जात आहे. ओटीटीला दररोज मोठ्या प्रमाणात ग्राहकवर्ग मिळत आहे. लोकप्रिय डिज्ने प्लस, हॉटस्टार, नेटफ्लिक्स इत्यादी ओटीटी व्यतिरिक्त इतर ओटीटीला देखील लोकांकडून पसंती दिली जात असल्याचे सांगितले गेले आहे. यामध्ये सोनी लिव्ह, वूट, झी5, इरॉसनाऊ इत्यादी प्लॅटफॉर्मना देखील पसंती दिली जात आहे.
हे ही वाचा:
विकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा
भारतीय नौदलाच्या ताफ्यात अमेरिकेची एमएच-६०आर हेलिकॉप्टर्स दाखल
‘या’ शिवसेना नेत्यामागेही लागला ईडीचा ससेमिरा
या अहवालाने व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार ओटीटी बाजारपेठ तेजीत असून 2021 मध्ये 1.5 बिलीयन डॉलर आकारमान असलेले हे उद्योगक्षेत्र वाढून 2025 पर्यंत 4 बिलीयन डॉलर पर्यंत वाढेल. ही वाढ 2030 पर्यंत 12.5 बिलीयन डॉलर इतकी असेल असेही भाकित केले जात आहे.
या दृश्य माध्यमांबरोबरच श्राव्य ओटीटीनांदेखील पसंती मिळत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गाना, जिओ सावन, विंक म्युसिक यांना देखील ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. श्राव्य ओटीटीची बाजारपेठ देखील सध्या 0.6 बिलीयन डॉलर असून 2025 पर्यंत त्याची वाढ 1.1 बिलीयन डॉलर पर्यंत वाढ होईल तर 2.5 बिलीयन डॉलर एवढी वाढ 2030 पर्यंत होण्याचे भाकित केले गेले आहे.
कोविड 19 महामारिचे संकट ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी महत्त्वाचे ठरले असल्याचे मत या अहवालातून व्यक्त करण्यात आले आहे. कोविड काळात नेटफ्लिक्स, डिज्ने प्लस हॉटस्टार इत्यादी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली असल्याचे मत देखील या अहवालातून व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील 4-5 वर्षांच्या काळात या क्षेत्रातील स्पर्धा अधिकाधीक तीव्र होणार असल्याचे देखील सांगितले गेले आहे.
या अहवालानुसार ओटीटीचे दरडोई सरासरी उत्पन्न 2021 मध्ये 7.2 डॉलर आहे. त्याबरोबरच सध्या असलेल्या एकूण वापरकर्त्यांची संख्या वाढून 2025 पर्यंत ती 462.7 मिलीयन होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.