विवो,ओप्पो, शाओमी भारतातून निर्यात करण्याच्या मार्गावर

केंद्र सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश

विवो,ओप्पो, शाओमी भारतातून निर्यात करण्याच्या मार्गावर

इलेक्ट्रॉनिक आणि स्मार्टफोनच्या उत्पादनासाठी स्मार्टफोनच्या उत्पादनासाठी भारताला जगातील प्रमुख केंद्र बनविण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश मिळत आहे. विवो, ओप्पो आणि शाओमी या आघाडीच्या चिनी मोबाईल कंपन्यांनी भारतीय बनावटीची मोबाईल उपकरणे जगभरात निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. या मोबाईल उपकरणांचे उत्पादन या कंपन्यांच्या चीन येथील प्रकल्पात होत आहे. आता या कंपन्या आपले काही उत्पादन चीनमधून भारतात हलवण्याचा विचार करत आहे.

अमेरिकेतील ऍपल आणि कोरियाच्या सॅमसंगच्या पावलावर पाऊल टाकत या चीनच्या तीन आघाडीच्या उत्पादकांनी आता भारतातून निर्यात सुरू करण्याच्या तपशीलवार योजनांना अंतिम रूप दिले आहे. शेजारच्या देशांबरोबरच आफ्रिका, मध्य पूर्व, लॅटिन सारख्या संभाव्य तसेच अमेरिकाआणि युरोप या निर्यात बाजारपेठ असू शकतात . सरकारने जाहीर केलेली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना ही या चीनमधील कंपन्यांच्या धोरणात होणाऱ्या बदलाचे प्रमुख कारण मानले जात आहे. पीएलआय योजनेच्या अंतर्गत सर्व चिनी गुंतवणुकीसाठी परवानगी घ्यावी लागेल असे केंद्र सरकारने आधीच स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा :

भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार

मुलानेच ७० वर्षीय आईची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, पण

हॉटेलमध्ये शिजला कापड व्यवसायिकाच्या हत्येचा कट

नाशिककरांची ८ तारीख ठरली ‘अपघाताची’

कोविड आणि लडाखमधील तणाव यामुळे सरकारने चीनमधून गुंतवणूककमी करण्याचे धोरण अवलंबले आहे. चीनची गुंतवणूकच नाही तर विदेशी थेट गुंतवणुकीच्या माध्यमातून स्वयंचलित मार्गाने मंजुरी देणेही बंद केले आहे. चीनच्या दूरसंचार कंपन्या पुरवठादारांच्या प्राधान्यकृत यादीत नाहीत. या गोष्टीमुळे देखील चीनच्या मोबाईल कंपन्यांच्या भूमिकेत आता बदल होताना दिसत आहे. व्हिवोने भारतातून निर्यातीची चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. सॅमसंगने या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत २.८ अब्ज डॉलर किमतीचे फोन निर्यात केले. भारतातील फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉनच्या कारखान्यांमध्ये आयफोनचे उत्पादन करणाऱ्या ऍपलने  २.२ अब्ज डॉलर्सची किमतीच्या मोबाईलची निर्यात केली आहे

Exit mobile version