सुमारे ४ हजार ३८९ कोटी रुपयांचा कर चुकवेप्रकरणी आता ऑप्पो इंडिया या आणखी एका चिनी मोबाईल कंपनीवर छापा मारण्यात आला आहे. संपूर्ण भारतामध्ये उत्पादन, असेंबलिंग, घाऊक व्यापार, मोबाईल हँडसेट आणि त्यांच्या ऍक्सेसरीजचे वितरण करण्याच्या या व्यवसायात कार्यरत असलेल्या ऑप्पो इंडियावर महसूल गुप्तचर संचालनालयाने ४ हजार ३८९ कोटी रुपयांची कस्टम ड्युटी बुडवली असल्याचा आरोप केला आहे.
ऑप्पो इंडिया ही Guangdong Oppo Mobile Telecommunications Corp Ltd ची उपकंपनी आहे. या चिनी कंपनीला ४ हजार ३८९ कोटी रुपयांची कस्टम ड्युटी भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याशिवाय, नोटीसमध्ये ऑप्पो इंडियाच्या कर्मचाऱ्यांवर आणि ओप्पो चीनवर दंड आकारण्याचा प्रस्ताव आहे.
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ओप्पो मोबाईल हे ओप्पो इंडिया नावाने ओळखले जातात. ओप्पो इंडिया विरोधात महसूल गुप्तचर संचालनालया कडून चौकशी सुरू होती. यामध्ये ४ हजार ३८९ कोटींची करचोरी समोर आली आहे. या तपासादरम्यान महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑप्पो इंडियाचे कार्यालय आणि व्यवस्थापनाशी निगडीत असलेल्या काही प्रमुख व्यक्तींच्या घराची झडती घेतली. यामध्ये काही महत्त्वाचे दस्ताऐवज सापडले आहेत.
या दस्ताऐवजांनुसार, ओप्पो इंडियाने मोबाइल फोनच्या उत्पादनाशी निगडीत काही वस्तूंच्या आयातीबाबत जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे ऑप्पो इंडियाला चुकीच्या पद्धतीने २ हजार ९८१ कोटींच्या कराची सवलत मिळाली. महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या चौकशीत कस्टम अधिकाऱ्यांना आयाती दरम्यान चुकीची माहिती दिली असल्याचेही समोर आले आहे.
हे ही वाचा:
कोळसा घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई
राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष; सर्व यंत्रणा सतर्क
महाराष्ट्राला ‘राष्ट्रीय खनिज विकास’ पुरस्कार
तंत्रज्ञान, ब्रॅण्ड, आयपीआर परवान्याचा वापर करून ऑप्पो इंडियाने चीनमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांना रॉयल्टी आणि परवाना शुल्क भरण्याची तरतूद केली होती. ओप्पो इंडियाने भरलेली रॉयल्टी आणि परवाना शुल्क आयात केलेल्या वस्तूंच्या व्यवहार मूल्यामध्ये जोडली जात नव्हती. ही बाब म्हणजे कस्टम ड्युटी चुकवण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे
अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चिनी स्मार्टफोन कंपनी विवोची करचोरी पकडली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, विवोने कर टाळण्यासाठी ६२ हजार ४७६ कोटी रुपये चीनला पाठवले. कंपनीच्या व्यवसायाचा जवळपास निम्मा वाटा आहे.