गुढीपाडव्याच्या दिनी सोन्याच्या दरात वाढ, चांदीही वधारली

गुढीपाडव्याच्या दिनी सोन्याच्या दरात वाढ, चांदीही वधारली

राज्यात आज सर्व ठिकाणी गुढीपाडवा जल्लोषात साजरा केला जातोय. याच पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक लोक सोने चांदीची खरेदी करतात. यामुळे आज सोन्याचांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४८ हजार १०० रुपये आहे. तर आज चांदीचा भाव ६७ हजार ६०० प्रति किलो आहे.

आजच्या गुढीपाडव्याच्या दिनी बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. सोने चांदीसह इतर वस्तूंच्या खरेदीसाठीही ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. इतर वस्तूंच्या तुलनेत सोन्या चांदीच्या भावात वाढ झाली आहे. कालच्या दरापेक्षा आज सोन्याचा दर ४५० रुपयांनी वाढला आहे.

हे ही वाचा:

राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष….

श्रीलंकेत परिस्थिती चिघळली; आणीबाणी लागू

मोदी म्हणाले आगामी वर्षात सर्व मनोकामना पूर्ण होवोत

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झाला ‘ऐतिहासिक’ करार

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८ हजार १०० रुपये आहे. मात्र मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला असून मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२ हजार ४७० प्रति १० ग्रॅम आहे. तसेच पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८हजार १८० असून तिथे २४ कॅरेट सोन्याचा दर ५२ हजार ५५० रुपये झाला आहे. नागपूर मध्येही सोन्याचा वधारला आहे. नागपुरात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८हजार १८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२हजार ५५० रुपये इतका आहे. तर चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६७६ रुपये आहे आणि किलोचा दर ६७ हजार ६०० रुपये आहे.

Exit mobile version