भारतात बंगळुरूच्या जवळ ओलाचा इलेक्ट्रिक स्कुटर उत्पादनाचा मोठा कारखाना लवकरच उभा राहात आहे. आपल्या पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर या कारखान्यातून प्रत्येक सेकंदाला २ इलेक्ट्रिक स्कुटरची निर्मिती होऊ शकेल.
हे ही वाचा:
बंगळूरूपासून रस्त्याने अडीच तासाच्या अंतरावर असलेल्या ५०० एकराच्या भूखंडावर ओलाचे संस्थापक अग्रवाल यांचा इलेक्ट्रिक स्कुटर उत्पादनाचा नवा कारखाना उभा करण्याचा प्रयत्न आहे. पुढील १२ आठवड्यात हा कारखाना उभा राहिल अशी अग्रवाल यांची अपेक्षा आहे.
इलेक्ट्रिक स्कुटरच्या निर्मितीच्या कारखान्याच्या मार्फत ओला आता टेस्ला, निओ यांसारख्या बलाढ्य कंपन्यांना टक्कर द्यायला सज्ज होत आहे. जर सर्वकाही ठरलेल्या आराखड्याप्रमाणे पार पडले तर, ‘ओला इलेक्ट्रिक मोबिलीटी प्रा.लि.’ या कंपनीला दरवर्षी १० मिलियन इलेक्ट्रिक स्कुटरचे उत्पादन करता येण्याची आशा आहे. हा आकडा जगातील इलेक्ट्रिक स्कुटरच्या उत्पादनांच्या १५ टक्क्यांएवढा आहे. पुढील वर्षी या कारखान्याचा विस्तार झाल्यानंतर या कारखान्यातून दर २ सेकंदाला स्कुटरची निर्मिती शक्य आहे.
अग्रवाल यांना केवळ स्कुटर निर्मिती करुन थांबायचे नाही, तर लवकरच संपूर्ण इलेक्ट्रिक चार चाकी गाडीचे उत्पादन देखील भारतात व्हावे यादृष्टीने हा कारखाना हे पहिले पाऊल आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया योजनेला पाठबळ मिळेल.