ओला इलेक्ट्रिक दुचाकी नंतर आता ओला इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहे. ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर याबाबत संकेत दिले आहेत. त्यांनी आगामी इलेक्ट्रिक कारचे एक छायाचित्र ट्विटर हॅन्डलवर शेअर केले आहे. लाँचची तारीख किंवा अजूनतरी वैशिष्ट्यांबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध केली गेली नाही.
एका ग्राहकाने Tata Nexon EV आणि Ola S1 ई-स्कूटर खरेदी केली. आणि पुढील वेळी येऊ तेव्हा इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची इच्छा त्या ग्राहकाने व्यक्त केली. या ग्राहकाला उत्तर देत ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट केले की, पुढच्या वेळी तुम्ही कार बदलून नवीन कार घ्याल तेव्हा ती इलेक्ट्रिक कार असेल.”
या ट्विटला लोकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर अग्रवाल यांनी ट्विटरवर एक फोटो इलेक्ट्रिक कारचा फोटो शेअर केला आहे. यात संकल्पित कार डिझाइनवर कंपनीचा लोगो आहे. ट्विटवर त्यांनी “तुम्ही गुप्त ठेवू शकता का?” असे शीर्षक दिले आहे.
Can you guys keep a secret? 🤫🤫 pic.twitter.com/8I9NMe2eLJ
— Bhavish Aggarwal (@bhash) January 25, 2022
हे ही वाचा:
सीडीएस बिपिन रावत, प्रभा अत्रे, सोनू निगम पद्म पुरस्काराने गौरवित
राज्यातील महाविद्यालये या तारखेपासून होणार सुरू
प्रजासत्ताक दिनाच्या गुगलकडून भारतीयांना खास शुभेच्छा
अमेझॉनवर भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप
ओला इलेक्ट्रिक कारबद्दल बोलताना, भाविश अग्रवाल यांनी यापूर्वी सांगितले होते की, ”ओलाची पहिली इलेक्ट्रिक कार २०२३ मध्ये येणार आहे. या प्रकल्पाला जपानच्या सॉफ्टबँक ग्रुपचा आधार मिळाला आहे. भारताला जागतिक इलेक्ट्रिक वाहन हब बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. तथापि, ओलाने त्याच्या आगामी इलेक्ट्रिक कारबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.”
ओला इलेक्ट्रिकच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ” इलेक्ट्रिक कारसाठी काम सुरू आहे आणि भाविश अग्रवाल यांनी जारी केलेला टीझर फोटो या संकल्पित कारचा आहे. तसेच, सध्याची फ्युचर फॅक्टरी दुचाकींसाठी आहे. आमच्या चारचाकी वाहनांना वेगळ्या फ्युचर फॅक्टरीची आवश्यकता असेल. आजचे ट्विट हे सध्याच्या चारचाकीच्या डिझाईनच्या टीझरच्या अनुषंगाने आहे.”
राइड-शेअरिंग सर्व्हिस एग्रीगेटर स्टार्टअपने भारतीय बाजारपेठेत अनेक वर्षे स्वतःला स्थिर केल्यानंतर, गेल्या वर्षी इलेक्ट्रिक वाहन निर्मीती व्यवसायात प्रवेश केला. त्यांनी ओला S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केल्या, ज्या भारतात बनवल्या गेल्या आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता, कंपनीने इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्येही उतरण्याचा निर्णय घेतला आहे.