यंदाच्या वर्षी ऑगस्टमध्ये देशातील डिमॅट खात्याच्या संख्येने प्रथमच १० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आर्थिक सर्वसमावेशकाच्या दृष्टीने देशाने एक मैलाचा दगड पार केला आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये २२ लाखांपेक्षा जास्त नवीन खाती उघडण्यात आली आणि हा आकडा १० कोटी ५ लाखांवर गेला आहे.
कोविडपूर्व काळात म्हणजे मार्च २०२० मध्ये केवळ ४ कोटी ९ लाख डिमॅट खातेधारक हाेते. परंतु, देशात आर्थिक जागरूकता वाढल्याने गेल्या महिन्यात डिमॅट खात्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. खाते उघडणे, मोबाईल वापरातील वाढ आणि ब्रोकरेज दरात झालेली घट यामुळे डिमॅट खात्यांची संख्या वाढण्यास मदत झाली.
दोन डिपॉझिटरीजमधील ताज्या डेटावरून असे दिसून आले आहे की, ऑगस्ट अखेरपर्यंत, सीएसडीएलकडे ७.२ कोटी डिमॅट खाती होती तर एनएसडीएलची संख्या २.९ कोटी होती. जानेवारी २०२१ मध्ये, डिमॅट खात्यांच्या एकूण संख्येने ५ कोटींचा टप्पा ओलांडला होता, तर मार्च २०२० पर्यंत ही संख्या सुमारे ४.१ कोटी होती असं आकडेवारी सांगते.
हे ही वाचा:
मॉस्कोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा
शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ईडीकडून अटक
थायलंडवासियांची ‘वार्ता आरती’ची पाहिलीत का?
पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर हल्ला
आर्थिक क्षेत्राचे डिजिटलायझेशन, डिस्काउंट ब्रोकरेजचा प्रसार आणि व्हिडिओ- आधारित इकेवायसी प्रक्रियेचा मार्ग मोकळा करणारे नियामक बदल यामुळेही डिमॅट खात्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे. डिमॅट खात्यांची संख्या १० काेटींचा टप्पा पार करणे हे समभागातील गुंतवणुकीची संस्कृती भारतात हळूहळू वेग घेत आहे. विशेष करून द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये हे प्रमाण वाढत असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणं आहे. प्रक्रिया डिमॅट खात्यांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ हे महानगरे आणि मोठ्या शहरांच्या बाहेर इक्विटी संस्कृतीच्या प्रसाराचे लक्षण आहे.