25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरअर्थजगतएनएसईत ५० लाख लोक गुंतवणूक करत होते आज ती संख्या ७.५ कोटी

एनएसईत ५० लाख लोक गुंतवणूक करत होते आज ती संख्या ७.५ कोटी

एनएसईचे सीईओ आशीष चौहान यांनी सांगितली भारतीय शेअर बाजाराची स्थिती

Google News Follow

Related

राष्ट्रीय शेअर बाजार तथा एनएसईची स्थापना होऊन आज २८ वर्षे झाली आहेत मात्र येत्या काळात ही संस्था भरभराटीस येईल. कारण या संस्थेने ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती साधली आहे तशी यंत्रणा अन्यत्र नाही, अगदी अमेरिकेसारख्या देशालाही आपली ही यंत्रणा सायफाय वाटते, असे उद्गार एनएसईचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशीष चौहान यांनी काढले. बिझनेस टुडेच्या कार्यक्रमात बोलताना चौहान यांनी एनएसईचे महत्त्व विषद केले.

 

चौहान म्हणाले की, १९९४ ते आजपर्यंत पाहतोय एनएसई सुरू झाली तेव्हा भारताची भांडवली बाजारातील गुंतवणूक ४ लाख कोटी रुपये होती ती आता २८ वर्षांनी ३.६ ट्रिलियन डॉलर्स झाली आहे. रुपयांत ही ८० पटीने अधिक वाढ झाली आहे. तेव्हा २०-३०-५० लाख लोक हे गुंतवणूक करत होते. आता ७.५ कोटी पॅन नंबर माझ्याकडे नोंदणीकृत आहेत. ५ कोटी घरे ही एनएसईच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. १७ टक्के घरे ही एनएसईशी जोडलेली आहेत. ही जी ३.६ ट्रिलियन डॉलर इतकी गुंतवणूक आहे ती भारताच्या एकूणच गुंतवणूकीच्या एक तृतियांश आहे. चौहान म्हणाले की, अनेक लोक जे एकमेकांना ओळखत नाहीत ते शेअर बाजारात गुंतवणूक करतात.

 

 

ते म्हणाले की, हर्षद मेहताच्या स्कॅमनंतर सरकारला नवे एक्स्चेंज हवे होते ज्यात शेअर दलालांचा सहभाग नसेल. त्यासाठी पाच जणांची नियुक्ती करण्यात आली त्यात मी एक होतो. एनएसईच्या स्थापनेतला मी एक भाग आहे. स्वातंत्र्यानंतर आपण समाजवादी अर्थव्यवस्था उभारण्याकडे लक्ष दिले होते. राष्ट्रउभारणीत त्याचा सहभाग नव्हता पण १९९१मध्ये जेव्हा मुक्त अर्थव्यवस्था आली तेव्हा राष्ट्रउभारणीत शेअर बाजाराचा सहभाग कसा असेल याचा विचार सुरू झाला. एकूणच चित्र बदलले. भांडवल उभारणी, संपत्तीनिर्मितीसाठी किंवा नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी आपण काय करू शकतो, याचा विचार सुरू झाला.

 

भारतातील माहिती तंत्रज्ञान समोर येऊ आले. एनएसईने ते दाखवून दिले आणि भारत हेदेखील करू शकतो, हा विश्वास दिला. एक प्रकारची माहिती तंत्रज्ञानातील ही क्रांती होती. ई पेमेंट्स, इ गव्हर्नन्स आज आपण पाहतो पण तेव्हा ई कॉमर्स चळवळ तेव्हा सुरू झाली. अर्थात तेव्हा ई कॉमर्स हा शब्द वापरला जात नव्हता पण त्यामुळे आत्मविश्वास उंचावला.

 

 

आपण यानंतर काय करू शकतो हे जाणून घेण्यासाठी आपण काय होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. १९९५मध्ये एनएसई निफ्टी निर्देशांक सुरू झाला. तेव्हा तो १००० होता पण आता १९ हजार ३०० आहे. आता आपली ३.८ ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक आहे. २५ वर्षात जबरदस्त कामगिरी करू. गेल्या १००० वर्षात प्रचंड संपत्ती निर्माण झाली कारण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. आपण तेव्हा त्याच्या कुठेही जवळ नव्हतो पण तंत्रज्ञान आल्यानंतर आपण वेग घेतला. जेव्हा एनएसई सुरू झाली तेव्हा आपण एवढी प्रगती करू असे वाटलेही नव्हते. तेव्हा कल्पनाही करू शकत नव्हतो.

हे ही वाचा:

सरला बेट विकासासाठी १५ कोटींचा निधी

नीरज चोप्रा जगज्जेता

रिलायन्सच्या बोर्डात आता इशा, आकाश, अनंत अंबानी

सांगलीमधील आश्रमशाळेतील १७० मुलांना विषबाधा

 

तंत्रज्ञानाचे फायदे

आपण जे करतोय ते अमेरिकेसाठीही सायफाय आहे. टी प्लस १ अंमलबजावणी केली आहे. तुम्ही आज व्यवहार केलात तर उद्या तुम्हाला पैसे मिळतील अशी ही यंत्रणा आहे. कोणत्याही ठिकाणी टी प्लस १ यंत्रणा नाही. सगळे देश याबद्दल बोलतात पण तिथे ही यंत्रणा नाही. आपण इथे त्याची अंमलबजावणी करू दाखवली आहे. आपण जागतिक स्तरावरील १५ ठिकाणी नवे तंत्रज्ञान कसे वापरत आहोत हे दाखवून दिले आहे. आमचे रेग्युलेटरही तंत्रज्ञानात मातब्बर आहेत.

 

गुंतवणूकदारांना सल्ला

सकाळी शेअर विकत घेऊन संध्याकाळी ते विकू नका. अशी संपत्ती निर्माण करता येत नाही. नाहीतर तुम्ही म्युच्युअल शेअर्समध्ये गुंतवणूक करा. भारताला जर प्रगतीपथावर न्यायचे असेल तर शेअर्समध्ये गुंतवणूक करा पण संयम राखा. लगेच शेअर्स विकू नका. अनेक वर्षे गुंतवून ठेवा. तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा