१४ वर्षांनी संपला काडीपेटीचा वनवास!

१४ वर्षांनी संपला काडीपेटीचा वनवास!

काडीपेटी स्वयंपाक घरातील एक महत्त्वाची वस्तू. परंतु याच वस्तूची किंमत तब्बल १४ वर्षांनी वधारली आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे काडीपेटीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. काडीपेटी तयार करण्याकरता १४ वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या मालाची गरज असते. यातील अनेक घटक असे आहेत की त्यांची किंमत दुप्पट झाली आहे.

रेड फॉस्फरसचा दर ४२५ रुपयांवरून ८१० रुपयांवर पोहोचला आहे. मेणाची किंमत ५८ रुपयांवरून ८० रुपये झाली आहे. आऊटर बॉक्स बोर्डची किंमत ३६ रुपयांवरून ५५ रुपये झाली आहे. इनर बॉक्स बोर्डची किंमत ३२ रुपयांवरून ५८ रुपये झाली आहे. याशिवाय कागद, स्प्लिंट, पोटॅशियम क्लोरेट, सल्फर सारख्या पदार्थांच्या किमतीतही ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे. या सर्व कारणांमुळे दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१४ वर्षात प्रथमच काडीपेटीच्या किंमतीत आता वाढ होणार आहे. नवीन काडीपेटीसाठी आता आपल्याला २ रुपये मोजावे लागणार आहेत. काडीपेटी तयार करणाऱ्या कंपन्यांनी एकत्रपणे हा निर्णय घेतलेला आहे. याआधी २००७ मध्ये काडीपेटीच्या दरामध्ये बदल झालेला होता. तसेच त्यावेळी काडेपेटीची किंमत ५० पैशांनी वाढवून १ रुपये करण्यात आली होती. आता नवीन दर दोन रुपये असणार असून, हा दर १ डिसेंबरपासून लागू होईल.

 

हे ही वाचा:

वेंकटेश प्रसाद-आमिर सोहेल चकमकीच्या आठवणी झाल्या ताज्या

५ ऑगस्ट २०१९ नंतर काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद, भ्रष्टाचाराचा अंत झाला

मास्क न घालणारे राज ठाकरेच कोरोनाग्रस्त

‘NobindiNoBusiness’ हॅशटॅगने सुतकी दिवाळी जाहिरातींना दिला दणका

 

सध्याच्या घडीला कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे काडीपेटीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उद्योग क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे. काडीपेटी तयार करण्यासाठी १४ वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या मालाची गरज असते. यातील अनेक घटक असे आहेत की त्यांची किंमत दुप्पट झाली आहे.

Exit mobile version