खुल्या ऑफरनंतर अदानी समूह आता मीडिया समूह न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (NDTV) चा सर्वात मोठा भागधारक बनला आहे. अदानी समूहाने ओपन ऑफरद्वारे एनडीटीव्हीमधील आपली भागीदारी ३७ टक्क्यांहून अधिक वाढवली आहे.
अदानी समूह एनडीटीव्हीमधील २६ टक्के हिस्सा घेण्याचा विचार करत होता. मात्र खुल्या ऑफरने केवळ ५३ लाख समभागांची ऑफर दिली होती. शनिवार, ४ डिसेंबर रोजी एनडीटीव्हीच्या शेअरधारकांनी अदानी समूहाला सुमारे ५३ लाख शेअर्स ऑफर केले होते. अदानी समूहाने अप्रत्यक्षपणे एनडीटीव्हीमधील २९.१८ टक्के भागीदारी एका छोट्या कंपनीचे अधिग्रहण करून विकत घेतली होती. त्यानंतर समूहाने मीडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांना खुली ऑफर दिली. स्टॉक एक्सचेंजच्या अधिसूचनेनुसार, खुली ऑफर ५ डिसेंबर रोजी बंद झाली. आता अदानी ग्रुप मीडिया कंपनीचा सर्वात मोठा भागधारक बनला आहे. त्यामुळे ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा अधिकारही अदानी समूहाला मिळणार आहे.
अदानींची ओपन ऑफर एनडीटीव्हीच्या सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत करण्यात आली होती. खुल्या ऑफर अंतर्गत, शेअरची किंमत २९४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. तर एनडीटीव्ही शेअर्स शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजमध्ये जवळपास ४१४ रुपयांवर बंद झाले. आतापर्यंत अदानी समूहाने ऑफर केलेले ८.२६ टक्के शेअर्स आहेत. याशिवाय, अदानी समूहाने यापूर्वीच २९.१८ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. आता एकत्रितपणे, मीडिया कंपनीमध्ये अदानी समूहाची भागीदारी ३७.४४ टक्के झाली आहे. अदानी समूहाची ही हिस्सेदारी संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्यापेक्षा जास्त झाली आहे. प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांचे एनडीटीव्हीमध्ये ३२.२६ टक्के हिस्सेदारी आहे.
हे ही वाचा :
‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’
पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका
एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला
संघाला विरोध मग पीएफआयच्या पाठीशी का?
दरम्यान, एनडीटीव्हीचे प्रवर्तक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी यापूर्वी तात्काळ प्रभावाने संचालक पदाचा राजीनामा दिला होता. यादरम्यान एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांनी एनडीटीव्हीचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर खरेदी केले होते.