देशावर मंदीचे सावट घोंघावत असल्याचे म्हटले जात आहे. पण वन विक्रीची आकडेवारी बघितली तर मंडी गायब झाली असल्याचं चित्र दिसत आहे. भारतीय वाहन उद्योगाने नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली आहे. गेल्या वर्षाच्या नोव्हेंबरच्या तुलनेत वाहनांच्या किरकोळ विक्रीत२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (फाडा )प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. १४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर हा लग्नसराईचा हंगाम आहे . लग्नसराईच्या हंगामामुळेच वाहन विक्रीने विक्रम नोंदवला आहे.
सणासुदीपासून विक्रीत वाढ झाली, जी लग्नाच्या हंगामातही कायम आहे. आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात देशात १८.५ लाख दुचाकींची विक्री झाली. दुचाकी, तीन चाकी, प्रवासी वाहने, ट्रॅक्टर आणि व्यावसायिक वाहनांच्या सर्व श्रेणींमध्ये अनुक्रमे २४ टक्के, ८०टक्के, २१ टक्के, ५७ टक्के आणि ३३ टक्के वाढ झाली आहे.
हे ही वाचा :
‘लव्ह जिहाद’ कायद्याची पडताळणी सुरु, फडणवीसांची माहिती
‘या’ शहरात आहे सोन्याची नाणी देणारे एटीएम
भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार
मुलानेच ७० वर्षीय आईची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, पण
आकडेवारीनुसार , नोव्हेंबरमध्ये एकूण २३ लाख ८० हजार ४६५ वाहनांची विक्री झाली. त्यापैकी दुचाकींची संख्या १८,४७,७०८ आहे. एक वर्षापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये एकूण १८,९३,६४७ वाहनांची विक्री झाली होती. त्यापैकी १४,९४,७९७ दुचाकींची संख्या होती.तीनचाकी वाहनांच्या विक्रीत २०१९ च्या तुलनेत वार्षिक ८० टक्के आणि ४ टक्के वाढ झाली आहे. प्रवासी वाहनांमध्ये २०१९ च्या तुलनेत २१ टक्के आणि ५ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
अनेक मॉडेल्सची उत्तम उपलब्धता, नवीन लॉन्च आणि ग्रामीण भागात वाढती मागणी यामुळे प्रवासी वाहनांची मागणी वाढत आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रावर आणि नवीन खाण प्रकल्पांवर सरकारने सतत लक्ष केंद्रित केल्यामुळे मालवाहू वाहनांची विक्री देखील वाढली असल्याचे दिसून येत आहे.