23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतएअर इंडियाच नाही या कंपन्यांचाही विमान खरेदी महोत्सव

एअर इंडियाच नाही या कंपन्यांचाही विमान खरेदी महोत्सव

Google News Follow

Related

टाटा समूहातील एअर इंडिया करत असलेल्या ४७० विमानांच्या खरेदीची जगभरात चर्चा होत आहे. एअर इंडियानंतर आता देशातील इतर विमान कंपन्यांनी देखील खरेदी महोत्सव सुरू केला आहे. देशातील विविध देशांतर्गत विविध विमान कंपन्यांनी एकूण १,१०० पेक्षा जास्त विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहेत.

देशातील सर्वात मोठ्या इंडिगो विमान कंपनीने सुमारे ५०० विमान खरेदीची ऑर्डर दिली आहे. अकासा एअर ७२ बोईंग नॅरो-बॉडी विमाने खरेदी करणार आहे.इतर कंपन्या देखील या खरेदीसाठी सज्ज आहेत. पूर्वी गो एअर म्हणून ओळखली जाणारी गो फर्स्ट ७२ तर विस्तारा कंपनी बोइंगकडून १७ विमाने खरेदी करणार आहे. अशा प्रकारे एअर इंडिया, इंडिगो, आकासा एअर, गोफर्स्ट आणि विस्तारा एकूण १,११५ नवीन विमाने खरेदी करणार आहेत. यापैकी १६ विमानांची वितरण झाले असून उर्वरीत ५६ विमानांचे वितरण बाकी आहे.

हे ही वाचा:

टीम इंडिया यत्र तत्र सर्वत्र!

संवाद तुटला नात्यांचा खून

बोगस लिपिक भरती.. धनंजय मुंडे यांच्या नावे मंत्रालयात घोटाळा

वरळीत ४२व्या मजल्यावरून कोसळले सिमेंटचे ब्लॉक; दोन जणांचा मृत्यू

एअर इंडियाने ५०० नवीन विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. नागरी विमान वाहतूक इतिहासातील हा सर्वात मोठा करार असल्याचे मानले जात आहे. हा खरेदी करार १०० अब्ज डॉलर्सचा असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

२,२१० विमानाची गरज भासणार
भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या हवाई बाजारपेठेपैकी एक आहे. येत्या १८ वर्षात देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत सुमारे ७ टक्क्यांनी वार्षिक वाढ होऊन पुढील दोन दशकांत देशाला सुमारे २,२१० नवीन विमानांची गरज भासणार असल्याचा अंदाज बोईंगने व्यक्त केला आहे. देशातील विमान कंपन्या पुढील एक किंवा दोन वर्षांत १,५०० ते १,७०० विमानांची ऑर्डर देतील असा अंदाज आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा