भारतातील ३० कोटी गाड्यांपैकी अर्ध्या गाड्यांचा विमाच नाही!

संसदेत अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिले उत्तर

भारतातील ३० कोटी गाड्यांपैकी अर्ध्या गाड्यांचा विमाच नाही!

कोरोनानंतर गाड्यांच्या खरेदीत विक्रमी वाढ झाली असली तरी भारतातील रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांपैकी ५० टक्के गाड्यांच्या मालकांनी थर्ड पार्टी विमाच काढलेला नाही. संसदेत ही माहिती एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली.

कृष्णा देवरायुलू यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कराड म्हणाले की, भारतीय रस्त्यांवर ३०.५ कोटी गाड्या नियमितपणे धावत असतात. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार १६.५ कोटी गाड्यांनी विमा काढलेला नाही.

प्रत्येक गाडी मालकाने थर्ड पार्टी विमा काढलेला असावा असा नियम आहे. मात्र अर्ध्या गाड्यांनी असा विमा काढलेलाच नाही. थर्ड पार्टी विम्यामुळे अपघातग्रस्ताला पैसे मिळू शकतात. अशा प्रकारचा विमा प्रत्येक गाडीने काढलाच पाहिजे. पण तसा विमा काढलेला नसल्यामुळे अपघातात जखमी अथवा मृत झालेल्या व्यक्तीला विम्याचे पैसे मिळू शकत नाहीत. या बेशिस्तीमुळे अनेक कुटुंबांना त्याचा मोठा फटका बसतो.

हे ही वाचा:

रवींद्र वायकरसुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीच्या यादीतून मेहुल चोक्सी गायब!

संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधी म्हणजे मीर जाफर!

संजय राऊतयांनी आता डोक्यालाच गुंडाळले!

बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तपन सिंघेल यांनी म्हटले की, भारतात असा विमा काढणे सक्तीचे असले तरी त्याबद्दल अनेक लोक जागरुक नाहीत त्यामुळे अपघातग्रस्तांचे मोठे नुकसान होते.

यासंदर्भात विमा नियामक मंडळातर्फे सर्व वाहनांनी विमा काढावा या उद्देशाने कोणती पावले उचलता येतील यासाठी विचार सुरू केला आहे. IRDAI अर्थात, विमा नियामक आणि विकास महामंडळाच्या वतीने अशी सूचना करण्यात आली आहे की, विमा कंपन्यांनी राज्य सरकारांशी समन्वय राखून किती वाहनांनी विमा काढला आहे, याची माहिती घ्यावी.

Exit mobile version