पेट्रोल, डिझेल दरवाढ टळली

पेट्रोल, डिझेल दरवाढ टळली

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात इंधन दरांवर ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर ऍंड डेव्हलपमेंट (एआयडीसी) सेस लावण्यात आला. पेट्रोलसाठी ही किंमत अडीच रुपये आहे, तर डिझेलवर चार रूपये इतका सेस आकारण्यात आला आहे. त्यामुळे इंधन दरात वाढ होणार असे भाकित केले जात होते. मात्र तसे होणार नाही. 

तसे न होण्याचे कारण म्हणजे पेट्रोलवर यापूर्वी बेसिक एक्साईज ड्युटी (बीईडी) आणि स्पेशल ऍडीशनल एक्साईस ड्युटी (एसएईडी) आकारली जात होती. हे दोन्ही कर अनुक्रमे ₹२.९८ आणि ₹१२ प्रति लीटर इतके होते. ते घटवून आता अनुक्रमे ₹१.४ आणि ₹११ करण्यात आला आहे. 

हेच दोन्ही कर डिझेलवरही लागू होते. त्यांच्या दरातही कपात करण्यात आली आहे. डिझेलवर बीईडी कर यापूर्वी ₹४.८३ प्रति लीटर इतका होता तो घटवून ₹१.८ प्रति लीटर करण्यात आला. डिझेलवर एसएईसी ₹९ प्रति लीट होता तो कमी करून ₹८ प्रति लीटर करण्यात आला. 

त्यामुळे होऊ शकणारी दरवाढ टळली आहे.

अशा प्रकारची कर पुनर्रचना मद्यपेयांबाबत देखील करण्यात आली आहे. आधी मद्यावर दीडशे टक्के बेसिक कस्टम ड्युटी आकारली जात होती ती आता थेट पन्नास टक्क्यांवर आणण्यात आली तरीही, अर्थसंकल्पात मद्यावरील एआयडीसी १०० टक्केच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांवर होणारी दरवाढ टळली आहे. 

Exit mobile version