निसान चेन्नईमधील कारखान्यातील उत्पादन वाढवणार

निसान चेन्नईमधील कारखान्यातील उत्पादन वाढवणार

कोविड-१९ च्या महामारिच्या पार्श्वभूमीवर आपल्या नव्या मॅग्नाईट या गाडीला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे निसान कंपनीने आपले चेन्नईच्या कारखान्यातील उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

निसान या मुळ जपानी कंपनीने त्यांच्या नव्या एस.यु.व्ही मॅग्नाईट या गाडीला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे चेन्नई येथील कारखान्यातील उत्पादन वाढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी कंपनी चेन्नईच्या कारखान्यात तिसऱ्या पाळीतही उत्पादन चालू करणरा आहे. कंपनीने १,००० अधिक कामगार वाढवणार असल्याचे सांगितले आहे.

याबरोबरच कंपनीने गाडी ग्राहकापर्यंत पोहोचती करण्याचा कालावधी दोन ते तीन महिन्यांपर्यंत कमी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी निसान कंपनीने गाडी विक्रीसाठी मनुष्यबळ वाढविण्याचे योजीले आहे.

निसानने आपली एस.यु.व्ही मॅग्नाईट ही गाडी भारतातल्या सर्व निसान गाडी विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल असे सांगितले आहे. त्या बरोबरच ही गाडी थेट कंपनीच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. कंपनीने, पुढील सुचना येईपर्यंत या गाडीवर विशेष सवलत उपलब्ध असल्याचेही सांगितले आहे.

Exit mobile version