आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पाची तयारी सुरु आहे. या अर्थसंकल्पाची तयारी करताना नेहमीप्रमाणे अर्थमंत्री निर्मला सितारामन जनतेला विसरलेल्या नाहीत. आगामी अर्थसंकल्पासाठी निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्य जनतेकडून सूचना आणि मते मागितली आहेत.
मायजीओव्ही ऍपवरून सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पासाठी त्यांची मते मांडता येणार आहेत. देशाचा अर्थसंकल्प कसा असावा, या अर्थसंकल्पात सरकारकडून जनतेला कोणत्या अपेक्षा आहेत. महागाई, नोकर कपातीच्या प्रश्नांवर सरकारने काय करणे अपेक्षित आहे, अशा प्रकारच्या सुचना जनतेला या ऍपच्या माध्यमातून सरकारला देता येणार आहेत. सूचना पाठवण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर असणार आहे.
लोकसहभागाला चालना देण्याच्या उद्देशाने दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी लोकांकडून सुचना मागितल्या जातात. यामुळे अर्थसंकल्प मांडताना लोकांच्या अपेक्षा, त्यांचे विचार लक्षात घेऊन अर्थसंकल्प मांडण्यास हातभार मिळतो.
हे ही वाचा :
बेल्जियमच्या तरुणीला चालून आले ‘प्रेक्षणीय स्थळ’
सोमालियाच्या लष्कराचा बॉम्ब हल्ला, १०० दहशतवाद्यांचा खात्मा
‘पोलिस’ निघाले चोर; २२ लाख लुटले
‘आदित्येंच्या वयापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेत आम्ही काम केलंय’
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पपूर्व बैठका २१ नोव्हेंबरपासून सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पीय बैठकांमध्ये हवामान बदल आणि पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष दिले जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२३ ला संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेची वाढ कायम ठेवण्यासाठी पावले उचलली जाणार, असल्याचं सीतारामन यांनी सांगितले आहे.