रेल्वेला मिळणार नवे विस्टाडोम डबे

रेल्वेला मिळणार नवे विस्टाडोम डबे

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच १८० किमी/प्रति तास जाऊ शकणाऱ्या नव्या तऱ्हेच्या विस्टाडोम डब्यांचे प्रारूप तयार असल्याची घोषणा केली आहे. 

अत्यंत उच्च दर्जाचे हे डबे, काश्मिर, दार्जिलींग, कालका- सिमला रेल्वे, निलगीरी, माथेरान या सारख्या इतर अनेक लोकप्रिय स्थानांच्या रेल्वेसाठी वापरले जातील.

विस्टाडोम डब्यांना मोठ्या काचा असतात. या डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्व बाजूंची दृश्ये दिसावीत अशी रचना असते.

जागतिक वारसा असलेल्या, युनेस्को मान्यता प्राप्त काही रेल्वेपैकी सिमला- कालका मेल एक आहे आणि आता गाडी क्र. ०४५१७/०४५१८ या गाड्यांना नव्या तऱ्हेचे विस्टाडोम डबे लावले जाणार असल्याचे दक्षिण पश्चिम रेल्वेने ट्वीट केले आहे.

चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी (आय.सी.एफ) कारखान्यात या डब्यांची रचना करण्यात आली आहे. हे डबे १८० अंशात फिरू शकणाऱ्या खुर्च्यांसकट, वाय-फाय आणि छतावरील काचेसारख्या आधुनिक सुखसोईंनी युक्त असतील. काच फुटल्यास प्रवाशांना अपाय होऊ नये यासाठी विशेष तऱ्हेच्या काचेची रचना करण्यात आली आहे.

Exit mobile version