Budget 2022 : अर्थव्यवस्थेला मिळणार नवी ‘गती शक्ती’

Budget 2022 : अर्थव्यवस्थेला मिळणार नवी  ‘गती शक्ती’

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशासमोर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये  ” पंतप्रधान गती शक्ती योजना ” ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून विकासाला गती मिळाली असून सर्व कामे वेळेवर होत आहेत.

प्रधानमंत्री गति शक्ती योजनेद्वारे पुढील पिढीच्या पायाभूत सुविधा आणि मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीलाही वीज मिळेल. तसेच, युवा पिढी, महिला आणि शेतकरी या वर्गाला प्राध्यान्य दिले जाणार आहे.

शंभर लाख कोटींच्या मास्टर प्लॅनमध्ये ६१ टक्के रक्कम राज्य आणि खाजगी कंपन्या गुंतवतील त्याशिवाय  ‘गती शक्ती’ योजना ही अनेक जुन्या योजनांचे रि-पॅकेजिंग आहे. ही योजना दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे.

पीएम गति शक्ती मास्टर प्लॅन हे सर्व विभागांसाठी केंद्रीकृत पोर्टल आहे. या पोर्टलद्वारे एकमेकांचे प्रकल्प शोधले जातील आणि मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी लोक, वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणीसाठी एकत्रित आणि अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.

हे ही वाचा:

Budget 2022: आज सादर होणार अर्थसंकल्प; या क्षेत्रांना मिळू शकते प्राधान्य

Budget 2022: विकास दर ९.२%, महागाईत घट! काय सांगतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल?

नवाब मलिकांवर सात दिवसात गुन्हा दाखल होणार

मुंबई, नागपूरसह दहा नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर? प्रशासक नेमणार?

पीएम  गतिशक्ती प्रकल्प सर्वसमावेशकता, प्राधान्य, अनुकूलता, समकालीन आणि विश्लेषणात्मक आणि गतिमान या सहा स्तंभांवर आधारित आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, लॉजिस्टिक खर्च कपात होईल, पुरवठा साखळी सुधारेल आणि स्थानिक वस्तू जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनतील.

देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शंभर लाख कोटी रुपयांच्या गतिशक्ती योजनेमुळे लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.

Exit mobile version