भारताचा परकीय चलन साठा नव्या उच्चांकावर पोहचल्याचे समोर आले आहे. भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीने ६ सप्टेंबरच्या अखेरीस ६८९.२३५ अब्ज डॉलर्सचा नवा उच्चांक गाठला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली आहे.
भारताच्या परकीय चलन साठ्यात ६ सप्टेंबर २०२४ रोजी म्हणजेचं आठवड्याच्या अंती ५.२४८ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. यामुळे हा साठा ६८९.२३५ अब्ज डॉलर्सवर पोहचला असून नव्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी ही माहिती दिली. यापूर्वी, ३० ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा २.३ अब्ज डॉलर्सने वाढून ६८३.९९ अब्ज डॉलर्स या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.
हे ही वाचा:
पोर्ट ब्लेअरचे नाव आता ‘श्री विजयपुरम’
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींच्या सहकाऱ्यांकडून पत्रकारावर हल्ला!
हरियाणा विधानसभा प्रचाराचे नेतृत्व पंतप्रधान मोदी, गडकरींसह ४० नेत्यांच्या हाती !
बिहारमध्ये बलात्कार करू पाहणाऱ्या डॉक्टरच्या गुप्तांगावर नर्सने केले वार !
आरबीआयने जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, विदेशी चलन मालमत्ता (FCA) ५.१० डॉलर्स अब्जने वाढून ६०४.१ अब्ज डॉलर्स झाली आहे. तर, सोन्याचा साठा १२९ दशलक्ष डॉलर्सने वाढून ६१.९८ अब्ज डॉलर्स झाला. दरम्यान, स्पेशल ड्रॉईंग राईट्स (SDR) उल्लेख केलेल्या आठवड्यात ४ दशलक्ष डॉलर्सने वाढून १८.४७ अब्ज डॉलर्स झाले आहेत.