‘कृष्णा गोदावरी धिरूभाई’ (केजी डी६) या रिलायन्सच्या नैसर्गिक वायूच्या प्रकल्पातील ‘सॅटेलाईट क्लस्टर’ मधील उत्पादनला रिलायन्स आणि ‘ब्रिटिश पेट्रोलियम’ (बीपी) सोमवारपासून सुरूवात करणार आहेत. हा प्रकल्प भारताच्या पूर्व किनाऱ्यावर स्थित आहे.
या प्रकल्पातील उत्पादनानंतर भारताच्या नैसर्गिक वायूच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे. रिलायन्स आणि बीपी खोल समुद्रातील उत्पादनासाठी तयारी करत होत्या. ‘केजी डी६’ प्रकल्पातील ‘आर क्लस्टर’, ‘सॅटेलाईट क्लस्टर’ आणि ‘एमजे’ या विहीरींमधील उत्पादनाला सुरूवात होणार आहे. या तिघांमधील एकत्रित उत्पादन ३० mmscmd (Million Metric Standard Cubic Meter Per Day) इतके असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जे भारताच्या सध्याच्या एकूण नैसर्गिक वायूच्या उत्पादनाच्या १५ टक्के आहे.
हे ही वाचा:
भारतीय जेम्स बॉण्ड, अजित डोवाल मुत्सद्देगिरीतसुद्धा भारी
वर्तकनगरातील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्ण दगावले
‘या’ चार राज्यांमध्ये १ मेपासून तरुणांना लस नाहीच
मोफत लसीकरणावरून मविआमध्येच जुंपली
यासाठी ‘केजी डी६’ मधील संपूर्ण पायाभूत सुविधांचा वापर होणार आहे. या समूहात रिलायनसचा ६६.६७ टक्क्यांचा वाटा आहे, आणि ब्रिटिश पेट्रोलियमचा वाटा ३३.३३ टक्के वाटा आहे.
‘केजी डी६’ भागातील तीन समुहांमधील ‘आर क्लस्टर’ मधील उत्पादनाला डिसेंबर २०२० मध्येच सुरूवात झाली. ‘सॅटेलाईट क्लस्टर’ ही तीन विहीरींपैकी दुसरी आहे, ज्यातील उत्पादन मूलतः २०२१च्या मध्यात सुरू होणे अपेक्षित होते.
हा समूह काकिनाडापासून ६० किमी दूर आहे. येथील पाण्याची खोली १८५० मीटर आहे.
या समूहातून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूचे उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकल्पातून भारताच्या एकूण उत्पादनाच्या २० टक्के उत्पादन होणे अपेक्षित आहे.