पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी सिलिंडरच्या किमतींच्या बाबतीत निर्णय घेतला असून अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी छोट्या व्यावसायिकांना भेट मिळाली आहे. व्यावसायिक वापरात असलेल्या सिलिंडरच्या किंमतीत ९१ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत आता १९ किलो सिलिंडरचा भाव १ हजार ८५७ रुपये इतका झाला आहे. याआधी जानेवारी महिन्यात सिलिंडर १०२ रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र, घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतींमध्ये बदल करण्यात आलेला नाही. आजपासूनच म्हणजेच १ फेब्रुवारीपासून हा नवा दर लागू होणार आहे.
आजच्या दर कपातीनंतर मुंबईत १९ किलो सिलिंडरचा भाव १ हजार ८५७ रुपये इतका झाला आहे. गेल्या महिन्यात तो १९४८.५० रुपये इतका होता. दिल्लीत या सिलिंडरची किंमत १ हजार ९०७ रुपये इतका झाला आहे. चेन्नईमध्ये १९ किलोच्या गॅससाठी २०३९.५ रुपये आणि कोलकात्यात १९८४.५ रुपये दर असेल, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सांगितले आहे. राष्ट्रीय तेल मार्केटिंग कंपन्यांनी ही दर कपात केली असून यामुळे देशातील हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा:
Budget 2022: आज सादर होणार अर्थसंकल्प; या क्षेत्रांना मिळू शकते प्राधान्य
Budget 2022: विकास दर ९.२%, महागाईत घट! काय सांगतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल?
नवाब मलिकांवर सात दिवसात गुन्हा दाखल होणार
मुंबई, नागपूरसह दहा नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर? प्रशासक नेमणार?
यापूर्वी सलग दोन महिने १९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. नोव्हेंबर महिन्यात वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत तब्बल २६६ रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या आढाव्यात हा सिलिंडर आणखी १०० रुपयांनी सिलिंडर महागला होता.