पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान – ३ च्या यशस्वी मोहिमेसाठी भारताच्या अंतराळ विज्ञानातील संशोधनाचे कौतुक करतानाच भारताच्या आणखी एका प्रगतीचा हवाला दिला. ‘पृथ्वी आणि चंद्रामध्ये जितके अंतर आहे, तेवढे किमीचे रस्ते गेल्या नऊ वर्षांत भारतातील गावांगावांत बनले आहेत,’ अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
तसेच, गेल्या पाच वर्षांत १३ कोटी ५० लाख भारतीय नागरिक दारिद्र्यरेषेवर आले. भारताची अर्थव्यवस्था बळकट होऊन भारतीय कुटुंबाचे उत्पन्नही वाढले. भारतीय नागरिक अधिकाधिक कमवत असून अधिकाधिक गुंतवणूक करत आहेत,’ असे मोदी यांनी सांगितले. ग्रीसमधील भारतीयांच्या समुदायासमोर ते बोलत होते.
मोदी यांना ग्रीसचे अध्यक्ष कॅटरिना साकेल्लारोपोऊलाऊ यांच्या वतीने प्रतिष्ठित असा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑनर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नरेंद्र मोदी हे गेल्या ४० वर्षांत ग्रीसच्या दौऱ्यावर जाणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. गेल्या १० वर्षांत ज्या अशक्यप्राय आणि कल्पनेपलीकडील गोष्टी होत्या, त्या आता प्रत्यक्षात होत आहेत. ‘जगातील सर्वांत उंचीवरील रेल्वेपूल आणि वाहने जाऊ शकणारा रस्ता, सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम, सर्वांत उंच पुतळा हे सर्व भारतात आहे. तसेच, जगातील सर्वांत मोठे ‘युगानु युगे भारत नॅशनल म्युझियम’ नवी दिल्लीत लवकरच साकारले जात आहे,’ अशी माहिती मोदी यांनी दिली.
हे ही वाचा:
शरद पवारांची नवी भूमिका; पक्ष म्हणजे फक्त आमदार नाही तर संघटना
लखनऊ- रामेश्वर रेल्वे गाडीला आग लागून आठ जणांचा मृत्यू
भारताचे तिघे भालाफेकीच्या अंतिम फेरीत
तेलंगणाची ‘सूरही’ ते नागालँडची ‘शाल’, ब्रिक्स परिषदेतील नेत्यांना मोदींकडून भेट !
‘जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडूनही भारताच्या अर्थव्यवस्थेचे कौतुक होत आहे. मोठमोठ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.