24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरअर्थजगत'हेलिकॉप्टर कारखाना हेच खोटे आरोप करणाऱ्यांना उत्तर'

‘हेलिकॉप्टर कारखाना हेच खोटे आरोप करणाऱ्यांना उत्तर’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला समाचार

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी कर्नाटकातील तुमकुरू येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्घाटन केले. यावेळी विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, कितीही मोठे खोटे बोलले तरी शेवटी त्याचा पराभव होतो. हेलिकॉप्टरचा हा कारखाना, एचएएलची वाढती शक्ती खोटे आरोप करणाऱ्यांचा पर्दाफाश करत आहे. विरोधकांच्या आरोपांना हा कारखानाच उत्तर आहे, हे सत्य आज बाहेर येत आहे अशी जोरदार टीका पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा वापर करून आमच्या सरकारवर विविध खोटे आरोप करण्यात आले. राफेल जेटवरून लोकांना भडकवण्यात आले आणि संसदेचा वेळ वाया घालवला. खोटे कितीही मोठे असो शेवटी त्याचा पराभवच होतो अशा शब्दात विरोधकांना चपराक लगावली.

हे ही वाचा:

बांग्लादेशात कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर हिंदू मंदिरे

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यातील ‘पंडित’ म्हणजे विद्वान

स्वतःचे नाव बदलून हिंदू मुलीचे केले धर्मांतर

नाना पटोलेंना आडव्या गेलेल्या मांजरीला कार्यकर्ते आडवे गेले!

२०१४ च्या आधीच्या १५ वर्षांत हवाई क्षेत्रात जेवढी गुंतवणूक झाली त्याच्या पाच पट गुंतवणूक गेल्या ८-९ वर्षात झाली आहे. आज आपण आपल्या लष्कराला मेड इन इंडिया शस्त्र तर देत आहोतच पण आपली संरक्षण निर्यात २०१४ च्या तुलनेत अनेक पटीने जास्त झाली आहे अशी माहितीही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

पीएम मोदी म्हणाले की, कर्नाटक ही नवनिर्मितीची भूमी आहे. ड्रोन ते तेजस विमाने राज्यात बनवली जात आहेत. कर्नाटक गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरली आहे. पंतप्रधान मोदींनी यांनी यावेळी त्यांनी लाइट युटिलिटी हेलिकॉप्टरचे अनावरणही केले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. यावेळी विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा