24 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरअर्थजगतदेशभरातील जमीन व्यवहारांत मुंबई अव्वल

देशभरातील जमीन व्यवहारांत मुंबई अव्वल

जानेवारी ते ऑगस्टदरम्यान तब्बल ३० टक्के करारांची नोंद

Google News Follow

Related

जानेवारी ते ऑगस्ट २०२३ दरम्यान देशभरात दोन हजार १८ एकरांपेक्षा जास्त जमिनीचे ५९ स्वतंत्र करार झाल्याचे ऍनारॉक ग्रुपने संकलित केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. यापैकी, मुंबई महानगर प्रदेशाने (एमएमआर) ९५ एकर जागांहून अधिक असे सर्वाधिक (१७) व्यवहार नोंदवले आहेत. हे भूखंड निवासी विकासासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत विविध शहरांत सुमारे एक हजार ४३८ एकर जमिनीचे ५१ सौदे करण्यात आले होते. मात्र त्यापैकी फारच कमी सौदे मोठ्या जमिनींचे होते, असे ऍनारॉकचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले.  

‘मोठ्या जमिनींचे तीन करार झाले. त्यामध्ये सर्वाधिक मोठा व्यवहार हा अहमदाबादमधील ७४० एकर जमिनीचा झाला. तर, लुधियाना आणि बेंगळुरूमधील प्रत्येकी ३००हून अधिक एकर जमिनींचे लिलाव झाले. करारांच्या संख्येच्या बाबतीत, निवासी स्थावर मालमत्तेने सर्वोच्च स्थान मिळवले,’ अशी माहिती पुरी यांनी दिली. अहवालानुसार, जानेवारी-ऑगस्ट २०२३मध्ये झालेल्या ५९ जमीन व्यवहारांपैकी २८३ एकरपेक्षा जास्त जमिनीचे ३८ सौदे हे पहिल्या सात शहरांमध्ये निवासी विकासासाठी प्रस्तावित आहेत. यातील एक हजार १३६ कोटी एकर जमिनीचे पाच करार आहेत.  

हे ही वाचा:

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान !

संजय राऊत म्हणतात पक्षाने आदेश दिला तर तुरुंगातही जातो, तर निवडणूकही लढू

चीनवरून प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसने आधी हिंदी चिनी भाई भाईचे उत्तर द्यावे !

राहुल गांधींना स्मृती इराणी म्हणाल्या… ‘ते तर पक्षाचे मालक, मी माझ्या पक्षाची कार्यकर्ती’  

चेन्नई, अहमदाबाद आणि लुधियानातील या जागांवर निवासी इमारती उभ्या राहणार आहेत. तर, चार करार ६२ एकरच्या भूखंडाचे झाले. त्यातील नोएडा, गुरुग्राम, पुणे आणि बंगळुरूमध्ये निवासी आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकल्प उभे राहणार आहेत. तर, १५४ एकर जमिनींचे तीन स्वतंत्र करार चेन्नई, रायगड आणि गुरुग्राम राज्यांचे झाले. एनसीआर शहरे असणाऱ्या दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये १६.५ एकर जमिनीचे तीन करार झाले असून येथे व्यावसायिक तत्त्वावर विकास केला जाणार आहे. तर, बंगळुरूमध्ये उत्पादन करण्यासाठी ३००हून अधिक एकर भूखंड विकत घेण्यात आला आहे. मुंबईत ५.५ एकर जागेच्या हॉटेलसाठी ७१ कोटी रुपयांचा करार झाला.  

जमिनीच्या सर्वाधिक क्षेत्रफळाचा विचार केल्यास या वर्षी सुमारे ७४० एकर जागांचा व्यवहार होऊन अहमदाबाद या यादीत अव्वल स्थानी राहिले आहे. मात्र ९५ एकरहून अधिक जमिनींचे १७ व्यवहार करून मुंबई अव्वल स्थानी आहे. हैदराबादमध्ये १८ एकरहून अधिक जमिनींचे दोन स्वतंत्र करार झाले. हे प्रमाण एकूण जमीन व्यवहारांच्या केवळ एक टक्का आहे. पुण्यात ४४ एकर जागांचे पाच स्वतंत्र करार झाले. शहरांतील एकूण जमिनीच्या क्षेत्रफळाच्या हे प्रमाण अवघे दोन टक्के आहे. येथे पूर्णत: निवासी आणि व्यापार व निवासी विकास होणार आहे. चेन्नईमध्ये १७८ एकर जागांचे पाच करार झाले. येथे विविध विकासकामे, आयटी पार्क तसेच, निवासी प्रकल्प उभे राहणार आहेत. तर, कोलकातात २५ एकर जमिनींचे तीन करार झाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा