मुंबई महानगरपालिकेने २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना हा अर्थसंकल्प सादर केला आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद महापालिकेने केली आहे. ४५ हजार ९४९ कोटींचा हा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा अर्थसंकल्पात १७.७० टक्क्यांची वाढ केली आहे. महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ही वाढ करण्यात आल्याची चर्चा रंगताना दिसत आहे.
यावेळी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने शिवसेना प्रेरित अर्थसंकल्प सादर केला असून, विकास कामांसाठी सुमारे २२ हजार ६४९ कोटी ७३ लाख रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच आरोग्य खात्यासाठी अंदाजे २ हजार ६६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
त्याशिवाय बेस्टच्या उपक्रमणसाठी ८०० कोटी आणि कोस्टल रोड उपक्रमासाठी ३ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात अली आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही थेट करवाढ केलेली नाही. पायाभूत सुविधा, आरोग्य आणि डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे दोनशे आरोग्य केंद्रे उभारली जाणार असून, त्यासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
अनिल देशमुख म्हणाले की, पोलिसांच्या पोस्टिंगची यादी अनिल परब देत असत!
नगरच्या गिर्यारोहकांचा नाशिक मध्ये मृत्यू
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
शिंदे स्पोर्ट्स, शरद पवार, सुधीर फडके आणि…
महापालिकेने शिक्षण विभागासाठी ३ हजार ३७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये डिजीटल शिक्षणासाठी २७ कोटींची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांची अकलन क्षमता वाढवण्यासाठी शाळेत बोलक्या संरक्षक भिंती निर्माण करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना हरभरे, मसूरडाळ आणि तांदूळही देण्यात येणार आहे. या योजनेचा सर्वच विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. मुलींसाठी उपस्थिती भत्ता आणि सर्व विद्यार्थ्यांना बसचा मोफत प्रवास मिळावा म्हणूनही या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. आहे त्या योजना सुरू ठेवण्यावर आणि शालेय प्रकल्प मार्गी लावण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.