मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ

मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ

Dabbawalas sorting tiffin lunch boxes before delivery in front of Churchgate railway station.

लंडनपर्यंत ‘मॅनेजमेंट गुरु’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईच्या हजारो डबेवाल्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. त्याला कारण ठरलाय तो कोरोना आणि लॉकडाऊन. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्यामुळे दोन वेळची भूक भागवण्यासाठी डबेवाल्यांना आपला व्यवसाय सोडून हाती पडेल ते काम करण्याची वेळ आली आहे. तर काही जणांनी हाती काम नसल्यामुळे गाव गाठलं आहे.

मुंबईतील एकूण पाच हजार डबेवाल्यांपैकी फक्त चारशे ते पाचशे डबेवाले काम करत होते. पण आता नव्याने लॉकडाऊन लावल्यामुळे त्यातील दोनशे ते अडीचशे डबेवाल्यांनी व्यवसाय बंद केला आहे. आम्ही सरकारला विनंती करतो की डबेवाल्यांना काही आर्थिक मदत करा, अशी विनंती विष्णू काळडोके यांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर गदा आलीय. त्यामुळे अनेकांनी आपलाय व्यवसाय सोडून आता अक्षरश: हमाली आणि सुरक्षा रक्षकाची नोकरी पत्करलीय. मधल्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा डबेवाल्यांना होती. पण पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे डबेवाल्यांचा व्यवसाय पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री- चंद्रकांत पाटील

मेडिकलची परीक्षा पुढे ढकलली, काय आहेत नव्या तारखा?

संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात- चंद्रकांत पाटील

कोविडच्या काळात ‘या’ कंपन्यांमध्ये हजारो नव्या नोकऱ्या

देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही- डॉ. हर्षवर्धन

नोकरी, व्यवसायासाठी कार्यालयात बसलेल्या आपल्या आप्तांना घरचं ताजं आणि पौष्टिक जेवण मिळावं अशी अपेक्षा घरच्या मंडळींना असते. त्यांची हीच अपेक्षा पूर्ण करण्याचं काम मुंबईतील पाच हजार डबेवाले करत होते. मुंबई परिसरातील घराघरातून जवळपास दोन लाख डबे गोळाकरुन ते वेळेत पोहोचवण्याचं काम हे डबेवाले करत. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक कार्यालयं बंद आहेत. अनेकांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं आहे. त्यामुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे. मधल्या काळात व्यवसाय पुन्हा सुरु करण्यात आला. पण आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आल्यामुळे डबे पोहोचवण्याचा काम बंद झालं आहे. बीकेसीतील डायमंड बाजारसारख्या महत्वाच्या भागात डबेवाल्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक डबेवाल्यांचा रोजगार बुडाला आहे. डबे पोहोचवण्याचा व्यवसाय बंद झाला असला तर पोटाची भूक बंद होत नाही. अशावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक डबेवाल्यांनी आता हमाली, तसंच सुरक्षा रक्षकाची नोकरी धरली आहे.

Exit mobile version