दाव्होसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींचे करार

एक लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती

दाव्होसमध्ये  १ लाख ३७ हजार कोटींचे करार

राज्यातून प्रकल्प पळवल्याचे तुणतुणे आदित्य ठाकरे, संजय राऊत वाजवत असतात. तर दुसऱ्या बाजूला तत्कालीन महाविकास आघाडीच्या कार्यकाळात दावोसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाल्याचे वारंवार सांगत असतात परंतु आतापर्यंत त्याचा तपशील मात्र त्यांनी कधीच दिला नाही. पण दावोस परिषदेवरून परतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमध्ये झालेल्या कराराची तपशीलवार यादी गुंतवणूक आणि रोजगाराच्या आकडेवारीसह ट्विट करून दिली आहे. हे करार कागदावरच राहणार नाही तर अंमलबजावणी होणार असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी महाविक्स आघाडीला लगावला आहे.

राज्याच्या विकासासाठी शासनाने केलेल्या प्रयत्नांना जनतेने दिलेली ही पोचपावती असल्याचे मी समजतो. या आर्थिक गुंतवणूक परिषदेत राज्यासाठी १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आम्हाला यश आले असून, त्या माध्यमातून १ लाख नवीन रोजगारांची निर्मिती राज्यात होणार आहे, असे मुख्यमंत्रांनी  सांगितले.

दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास व्यक्त मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

दावोस दौऱ्याबाबत आपण समाधानी आहोत. दावोस दौरा महाराष्ट्रासाठी अत्यंत फायद्याचा ठरला . दावोस दौऱ्यात जागतिक उद्योजकांशी चर्चा झाली. दावोसमध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे. त्यांचे मी आभार मानतो असे मुख्यमंत्रांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की , दावोस दौरा अतिशय फलदायी असा ठरला आहे. दावोसमधल्या परिषदेवर मोदी आणि भारताची छाप दिसून आली. दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारांची अमलबजावणी होणार आहे. हे करार नुसतेच करायचे यासाठी झालेले नाहीत. या करारातून १ लाखांपेक्षा जास्त प्रत्यक्ष य अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत.

असे आहेत सामंजस्य करार : गुंतवणूक आणि रोजगार

पुणे – रुखी फूड्स – ग्रीन फिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प – २५० कोटी गुंतवणूक

पुणे – निप्रो कार्पोरेशन (जपान) – ग्लास ट्युबिंग प्रकल्प – १,६५० कोटी गुंतवणूक – (२,००० रोजगार)

पुणे-पिंपरी – एलाईट प्लास्ट अँटो सिस्टीम्स (पोर्तुगाल) – प्लास्टिक ऑटोमोटिव्ह प्रकल्प – ४०० कोटी गुंतवणूक – (२,००० रोजगार)

मुंबई – इंड्स कॅपिटल पार्टनर्स – आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण सेवा – १६,००० कोटी गुंतवणूक

औरंगाबाद – ग्रीनको – नवीनीकरण ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प – १२,००० कोटी गुंतवणूक – (६,३००रोजगार)

चंद्रपूर- भद्रावती – न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन (अमेरिका) – कोल गॅसिफिकेशन प्रकल्प – २०,००० कोटी गुंतवणूक – (१५,००० रोजगार)

चंद्रपूर -मूल – राजुरी स्टील अँड अलाईज (इस्राईल) – स्टील प्रकल्प – ६०० कोटी गुंतवणूक – (१,००० रोजगार निर्मिती)

गडचिरोली – चार्मिशी – वरद फेरो अलाईज – स्टील प्रकल्प – १,५२० कोटी गुंतवणूक – (२,००० रोजगार निर्मिती)

महाराष्ट्र – गोगोरो इंजिनीअरिंग & बडवे इंजिनीअरिंग – ऑटो प्रकल्प – २०,००० कोटी गुंतवणूक – (३०,००० रोजगार)

महाराष्ट्र – बर्कशायर-हाथवे – नागरी पायाभूत सुविधा – १६,००० कोटी गुंतवणूक

महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल, १०,००० कोटी गुंतवणूक – (३,००० रोजगार)

लक्झम्बर्ग इन्व्हेस्टमेंट कंपनी – १२,००० कोटी गुंतवणूक – (१,२०० रोजगार)

हंस इन्फ्रोसोल्युशन प्रा. लि. वूडवीन -४,००० कोटी गुंतवणूक – (८०० रोजगार)

नुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथे – जपानच्या निप्पॉन टेलेग्राफ एंड टेलिफोन – डेटा सेंटर्स- २०,४१४ कोटी गुंतवणूक – (१,५२५ रोजगार )

Exit mobile version