चालकरहित मेट्रोला मोदींचा हिरवा झेंडा

चालकरहित मेट्रोला मोदींचा हिरवा झेंडा

दिल्ली विमानतळापासून सुरू होणाऱ्या मजंटा लाईनवर चालकरहित मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. 

भारताचेे १७०० किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे २०२५ पर्यंत तयार करण्याचे लक्ष्य आहे. सध्या भारतात ७०२ किलोमीटर लांबीचे जाळे अस्तित्वात आहे. 

या प्रसंगी बोलताना पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सांगितले की २०१४ मध्ये भारतात २४८ कि.मी लांबीचे मेट्रोचे जाळे अस्तित्वात होते. आता ते वाढून ७०२ कि.मी लांबीचे झाले आहे. त्यामुळे लोकांचे आयुष्य सुकर झाले आहे. पंतप्रधानांनी ३७ कि.मी लांबीच्या चालक रहित मेट्रोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

“सुमारे तीन वर्षांपूर्वी मी दिल्ली मेट्रोच्यी मजंटा लाईनचे उद्घाटन केले. आज मला चालक रहित मेट्रोचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे. हे भारताच्या प्रगतीचे द्योतक आहे.” असेही मोदी यांनी सांगितले.

मेट्रोमध्ये चालक न ठेवता संचलन नियंत्रण केंद्र (ओ.सी.सी)मधून मेट्रो चालवण्याचे तंत्रज्ञान वापरून, भारत हे तंत्रज्ञान असणाऱ्या थोड्या देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. 

मेट्रोसोबत मोदींनी ‘रुपे’ या नॅशनल मोबिलीटी कार्डचे देखील उद्घाटन केले. यामुळे हे कार्डधारक थेट मेट्रोतून प्रवास करू शकतात.

Exit mobile version