केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट

महागाई भत्ता ३ टक्क्याने वाढवून ३१ टक्क्यांवर

केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्ता (डीए) मध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा बदल एकदा लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए ३१ टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर दुपारी ३ वाजता प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना अनुराग ठाकूर म्हणाले. यापूर्वी सप्टेंबरमध्ये, अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना रोख पेमेंट आणि ग्रॅच्युइटी मिळेल असे निवेदन दिले होते.

यापूर्वी केंद्राने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिला जाणारा डीए आणि महागाई निवारण (डीआर) मध्ये १७ टक्क्यांवरून २८ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली होती.

१ जुलै २०२१ पासून ही वाढ लागू झाली आणि सुमारे ४८.३४ लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि ६५.२६ लाख पेन्शनधारकांना त्याचा फायदा झाला आहे. या निवेदनात १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत डीए भरण्याशी संबंधित बाबींचा उल्लेख केला होता.

हे ही वाचा:

पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

यामध्ये म्हटले होते की या कालावधीसाठी डीएचा दर “मूळ वेतनाच्या समान १७ टक्के राहील, ते १ जानेवारी २०२० रोजी उद्भवणारे अतिरिक्त हप्ते जमा करून मूळ वेतनाच्या २८ टक्के करण्यात आले (४ टक्के) , १ जुलै, २०२० (३ टक्के) आणि १ जानेवारी, २०२१ (४ टक्के) १ जुलै, २०२१ पासून देय आहे.”

Exit mobile version