देशातील कर्जबुडव्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आहे. ३१ मार्च २०२१ च्या अखेरपर्यंत हेतुपुरस्सर कर्ज बुडवणाऱ्यांची संख्या २२०८ वरुन २४९४ इतकी झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेला पत्राद्वारे दिली. आगामी काळात मोदी सरकार कर्जबुडव्यांकडून वसुलीसाठी कठोर पावले उचलून कर्जदारांसाठी हमीदार (गॅरंटोर) राहिलेल्यांविरोधात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. गरज पडेल त्या प्रमाणे हेतुपुरस्सर कर्जबुडव्यांविरूद्ध फौजदारी कारवाईदेखील बँका करू शकतात, असे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकार हुडको या सरकारी कंपनीतील ८ टक्के हिस्सेदारी विकणार आहे. संस्थात्मक गुंतवणुकदारांनी मंगळवारपासू यासाठी ४५ रुपयांच्या समभागाप्रमाणे बोली लावायला सुरुवात केली होती. हुडकोचे १६.०१ कोटी समभाग विकून केंद्र सरकारला ७२० कोटी रुपयांची कमाई होण्याची अपेक्षा आहे.
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता प्रबंधन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांच्या माहितीनुसार, ऑफर फॉर सेल पद्धतीने हुडकोच्या समभागांची विक्री होणार आहे. सामान्य गुंतवणुकदारांसाठी ही समभाग खरेदी आजपासून खुली होणार आहे.
हे ही वाचा:
अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर कालवश
काय आहे भारत-रशिया दरम्यानचा इंद्र-२१ युद्ध सराव?
बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री! शपथविधीचाही ठरला मुहूर्त
…म्हणून गुजरातमधील शहराला मिळाला ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ चा दर्जा
हुडकोची स्थापना २५ एप्रिल १९७० रोजी झाली होती. यापूर्वीही केंद्र सरकारने हिस्सेदारी विकून ७६४६ कोटी रुपये कमावले होते. त्यामध्ये ३६५१ कोटी रुपये ऑफर फॉर सेल पद्धतीने तर ३९९४ कोटी तर एक्सिस बँकेतील एसयुयुटीआयची हिस्सेदारी विकून ३९९४ कोटींची कमाई केली होती.