मेड इन इंडियाच्या बळावर ऍपलची निर्यात ४५ हजार कोटींवर

भारताची मोबाईल निर्यात ९० हजार कोटींच्या पार

मेड इन इंडियाच्या बळावर ऍपलची निर्यात ४५ हजार कोटींवर
देशात मेड इन इंडियाचे वारे वाहू लागल्यानंतर विविध क्षेत्रात उत्पादनाने वेग घेतला आहे. ऍपल कंपनी भारतात मोबाइल उत्पादन करत आहे. त्याच्या पाठबळावर देशातील मोबाईल उद्योगाने ११.२२ अब्ज डॉलरचा निर्यातीचा टप्पा पार केला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत मोबाईल निर्यातीत दुपटीने वाढ होण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे यात इपलच्या निर्यातीचा वाटा निम्मा म्हणजे ४५,००० कोटी रुपयांचा आहे.
 इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ आर्थिक वर्षांत भारतातून ४५,००० कोटी रुपयांची मोबाईल फोनची निर्यात झाली होती. २०२२ – २३ आर्थिक वर्षात ही निर्यात दुपटीने वाढून ११.१२ अब्ज डॉलरवर म्हणजे ९०,०००  कोटी रुपयांवर गेली आहे.
 मोठ्या प्रमाणावर निर्यात झाल्याशिवाय कोणतीही अर्थव्यवस्था ही  जागतिक अर्थव्यवस्था  बनू शकत नाही. मोबाईल निर्यातीची घौडदौड सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक्स निर्यातही ५८ टक्क्यांनी वाढून १,८५,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सरकारने देशातून १० अब्ज डॉलरच्या मोबाइल फोन निर्यातीचे लक्ष्य ठेवले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पंकज महेंद्रू यांनी सांगितले.

हे ही वाचा:

एलआयसीने घेतले अदानी कंपनीत आणखी शेअर्स, काँग्रेसचा तीळपापड

आरे-बीकेसी नंतर आता मेट्रो ३ वरळीपर्यंत धावणार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘आंबेडकर यात्रा ट्रेन’

केशुब महिंद्रा यांचे ९९ व्या वर्षी निधन

निर्यातीमध्ये सॅमसंगचा ४० टक्के वाटा
 सॅमसंगने  ३६,००० कोटी रुपयांची निर्यात केली आहे. निर्यातीमध्ये सॅमसंगचा जवळपास ४० टक्के वाटा आहे. एकूण निर्यातीमध्ये अन्य कंपन्यांच्या निर्यातीचा हिस्सा  सुमारे १.१ अब्ज डॉलर आहे. या कंपन्या भारतात बनवलेल्या सर्व ब्रँडचे फोन निर्यात करतात.
३०० अब्ज डॉलर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे उद्दिष्ट
सरकारने २०२५-२६ पर्यंत ३०० अब्ज डॉलर किंमतीच्या  इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे उद्दिष्ट  उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये निर्यातीतून १२०   अब्ज डॉलरचे उत्पन्न  अपेक्षित आहे. २०२५-२६ पर्यंत मोबाईल फोन निर्यातीचा वाटा ५० अब्ज डॉलरपेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. सध्या एकूण इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीमध्ये मोबाईल फोन निर्यातीचा वाटा ४६ टक्के आहे.
Exit mobile version